Maharashtra Unseasonal Rainfall: राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे सावट, 2-3 दिवसात पडणार पाऊस!
Maharashtra Unseasonal Rainfall : राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावासाचे सावट आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात आला आहे.

Maharashtra Unseasonal Rainfall: राज्यातील जनतेला गेल्या काही महिन्यांपासून हवामानातील बदलामुळे हिवाळ्यात (Winter) पावसाळा (Rainy), उन्हाळा (Summer) असे तिन्ही ऋतू एकत्र पाहायला मिळत आहे. आता राज्यातील हवामानासंदर्भात पुन्हा मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडीची लाट (Cold Wave) आहे. अशामध्ये आता राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावासाचे ( Unseasonal Rainfall) सावट आहे. त्यामुळे बळीराजा (Farmer) पुन्हा एकदा संकटात आला आहे. हवामान विभागाने (Weather Department) येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
Also Read:
राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये थंडीमुळे नागरिक त्रस्त आहे. प्रचंड थंडीमुळे सर्वजण गारठले आहेत. उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidharbh) थंडीमुळे धु्क्याचे सावट आहे. तर तर पश्चिम महाराष्ट्रातही (Western Maharashtra) प्रचंड थंडी पसरली आहे. येत्या 2 फेब्रुवारीपर्यंत राज्याच असंच वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यान वर्तवला आहे. त्याचसोबत येत्या 3 फेब्रुवारीपासून काही जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहील आणि त्याठिकाणी पावसाची (Rainfall) शक्यता असल्याचे देखील हवामान खात्याने सांगितले आहे.
दरम्यान, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीचा जोर कमी होईल असे हवामान खात्याने सांगितले आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून थंडीची लाट सुरु आहे. राज्यातल्या धुळे (Dhule) आणि नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा अजूनही निच्चांकी पातळीवर आहे. धुळ्यात 4.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली गेली. नंदुरबारच्या सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या ठिकाणी गारठा प्रचंड वाढला असून नागरिकांना हुडहुडी भरली आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या