मुंबई: बळीराजासह सगळ्यांना आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस (Monsoon 2021) पुन्हा सक्रीय होणार आहे. महाराष्ट्रात पुढील पाच दिवस सर्वत्र मुसळधार पाऊस (Weather Alert) होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अति मुसळधार पावसाची शक्यता होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारकडून स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आले आहेत.Also Read - Rain Update : राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिला इशारा!

राज्यात पालघर, मुंबई, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा हे जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यात ‘येलो’ अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. पुढील पाच दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात मुसळधार पाऊस होईल. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये दमदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथे शनिवारी, तर अमरावती, अकोल्यामध्ये रविवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. Also Read - PUNE RAPE CASE: पुण्यात डॉक्टरी पेशाला काळिमा! रुग्ण तरुणीवर बलात्कार करून विवस्त्रावस्थेत काढले फोटो

Also Read - Osmanabad News: शिक्षकी पेशाला काळीमा! 10वीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाने केले लैंगिक अत्याचार, पीडिता राहिली गरोदर

1 जुलैपर्यंत अतिमुसळधार-

नैऋत्येकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे पाऊस पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांच्या दिशेने पुढे सरकण्याची अधिक शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये 1 जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यात किनारपट्टीवर असलेल्या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विदर्भ तसेच मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. मात्र, दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणात देखील अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे. तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाबरोबरच हिमवृष्टीही होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.