Top Recommended Stories

Nawab Malik यांच्या समर्थनार्थ Mahavikas Aghadiच्या नेत्यांचे आंदोलन, तर विरोधात BJPची निदर्शनं!

Mahavikas Aghadi Protest : नवाब मलिक यांना समर्थन देण्यासाठी आणि मोदी सरकारचा तसंच त्यांच्या केंद्रीय यंत्रणांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन केले.

Published: February 24, 2022 4:35 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Mahavikas Aghadi Protest
Mahavikas Aghadi Protest

Mahavikas Aghadi Protest : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) बेकायदेशीररित्या अटक केल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. या कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते (Mahavikas Aghadi Leaders) आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नवाब मलिक जिंदाबाद… ईडी मुर्दाबाद… मोदी सरकार हाय हाय… मोदी सरकार चोर है… महाराष्ट्र लढेगा मोदी हारेगा… महाराष्ट्र ना कधी दिल्लीसमोर झुकला ना कधी झुकणार… आवाज कुणाचा महाविकास आघाडीचा अशा जोरदार घोषणा आणि फलक फडकावत महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी आणि हजारो कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी पुतळा परिसर दणाणून (Mahavikas Aghadi Leaders Protest) सोडला. तर दुसरीकडे नवाब मलिकांविरोधात भाजप आक्रमक झाले आहे. राज्यभरात भाजपचे कार्यकर्ते मलिकांविरोधात निदर्शनं (BJP Protest) करत आहेत.

Also Read:

नवाब मलिक यांना समर्थन देण्यासाठी आणि मोदी सरकारचा (Modi Government) तसंच त्यांच्या केंद्रीय यंत्रणांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते, मंत्री आणि अख्ख्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ एकत्र येत आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचे नेते, मंत्री आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोदी सरकार आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. या आंदोलनात तिन्ही पक्षांच्या महिला कार्यकर्त्यांनी देखील उपस्थिती लावली होती. या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार आणि ईडीच्या नावाने शिमगा घातला.

You may like to read

तर दुसरीकडे नवाब मलिक यांना केंद्र सरकारने (Central Government) नव्हे तर न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांना ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे या मागणीसाठी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये निदर्शने करत आहेत. भाजपने आरोप करत महाविकास आघाडीचे वनमंत्री संजय राठोड आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यास भाग पाडले. त्यानंतर आता भाजप नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी देखील आक्रमक झाले आहे. तर,नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याखेरीज राहणार नाही. त्याचबरोबर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा पाठपुरावा करतच राहू. तसंच संजय राऊत यांचे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण देखील अर्धवट सोडणार नाही, असा इशारा किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिला आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 24, 2022 4:35 PM IST