मुंबई: महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे, टोकियो ऑलिंपिक 2020 मध्ये (Tokyo Olympics 2020) भालाफेक (javelin throw) स्पर्धेत देशाला सूवर्ण पदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याला महिंद्रा कंपनीची आगामी एसयूव्ही 700 (XUV700) गिफ्ट मिळणार आहे. आनंद महिंद्रा यांनी खास शैलीत ट्वीट करून याबाबत घोषणा केली आहे.Also Read - Health Department Exam: आरोग्य विभागाची परीक्षा कधी होणार?, आरोग्यमंत्र्यांनी सांगितली संभाव्य तारीख!

ट्विटरवर एका फॉलोअरनं आनंद महिंद्रा यांना एक प्रश्न केला होता. नीरज चोप्राला एक्सयूव्ही 700 (XUV700)गिफ्ट देणार का? त्यावर रिट्वीट करत महिंद्रा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘होय, आपल्या गोल्डन एथलीटला एक्सयूव्ही 700 गिफ्ट करणं माझं सौभाग्य आणि सम्मान असेल.’ इतकंच नाही तर आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा एंड महिंद्रा लिमिटेडचे कार्यकारी व्यवस्थापक राजेश जेजुरिकर आणि सीईओ (ऑटोमोटिव्ह डिव्हिजन) विजय नाकरा यांना टॅग करत नीरज चोप्रासा एक एसयूव्ही (XUV700) सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. Also Read - तिसरी घंटा वाजणार! राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार


आनंद महिंदा (Anand Mahindra) यांनी एखाद्या खेळाडूला गाडी गिफ्ट करण्याची घोषणा केल्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी रियो ऑलिंपिकमध्ये पदक विजेता साक्षी मलिक आणि पीव्ही सिंधूला महिंद्रा कंपनीची (Mahindra Thar) गाडी गिफ्ट करण्यात आली होती. Also Read - Mandir Kadhi Ughadnar: मंदिरात जाताना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार, सरकारने जाहीर केली नियमावली!

याशिवाय आनंद महिंद्रा यांनी गाबामध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद सिराज, टी. नटराजन, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनीला महिंद्रा थार (Mahindra Thar) गिफ्ट करण्याची घोषणा केली होती. आज नटराजनला Thar गिफ्ट मिळाली आहे.

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics 2020) आजचा (7 ऑगस्ट) शेवटचा दिवस भारतानं गोड केला आहे. भालाफेकीत (javelin throw) भारताला सूवर्ण पदकाची कमाई केली आहे. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) गोल्ड मेडल (Gold Medal) पटकावलं आहे. भारताला 2008 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्रानं (Abhinav Bindra) सूवर्ण पदक मिळवून दिलं होतं. त्यानंतर तब्बल 13 वर्षांनी नीरज चोप्रानं इतिहास रचला आहे.

नीरज चोपड़ा ©AFP

भारताचे हे ऑलिम्पिक अ‍ॅथलेटिक्समधील 100 वर्षांतील पहिलंच पदक ठरलं आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमधील हे भारताचे एकूण सातवं पदक ठरलं. त्यामुळे भारतानं 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमधील 6 पदकांच्या सर्वोत्तम कामगिरीला मागे टाकलं आहे. भारताचे हे ऑलिम्पिक स्पर्धांतील केवळ दुसरं वैयक्तिक सूवर्णपदक ठरलं आहे. याधी नेमबाजीत 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्रानं भारताला पहिलं सूवर्णपदक मिळवून दिलं होतं.