नाशिक: तिरुपती बालाजीच्या (Tirupati Balaji) दर्शनासाठी निघालेल्या नाशिकच्या (Nashik) भाविकांवर वाटेतच काळानं घातला घातला. भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात ( Major Accident) होऊन त्यात 4 जणांचा (4 Death on Spot) जागेवरच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात (Accident in Osmanabad) तेरखेडाजवळ शुक्रवारी पहाटे ही दुर्घटना घडली.Also Read - Mandir Kadhi Ughadnar: मंदिरात जाताना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार, सरकारने जाहीर केली नियमावली!

मिळालेली माहितीनुसार, नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील काही भाविक टेम्पो ट्रॅव्हलरनं तिरुपतीच्या दर्शनासाठी (Tirupati Balaji) निघाले होते. त्यांचं वाहन उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा गावाजवळ आलं असता टायर फुटले. टायर बदलण्यासाठी चालकानं वाहन रस्त्याचा कडेला घेतलं. टायर बदलत असतानाच बीडकडून उस्मानाबादकडे जाणाऱ्या भरधाव टेम्पोनं भाविकांच्या ट्रॅव्हलर पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, 4 जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनं रस्त्याच्या कडेला पलटी झाले. अपघातातील गंभीर जखमींना उपचारार्थ सोलापूर येथे हलवण्यात आलं आहे. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. धडक दिलेल्या टेम्पोचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. त्याच्याविरुद्ध येरमाळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Also Read - Mandir Kadhi Ughadnar: घटस्थापनेच्या मुहूर्तावर सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली होणार, अखेर मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

अपघातातील मृतांची ओळख पटली आहे. शरद विठ्ठलराव देवरे (44, रा.वडगाव, ता. मालेगाव), विलास महादू बच्छाव (46, रा. सायने बु. ता. मालेगाव), जगदीश चंद्रकांत दरेकर (45, रा.दरेगाव, ता. मालेगाव) व सतीश दादाजी सूर्यवंशी (50, रा. दरेगाव, ता. मालेगाव) या चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर संजय बाजीराव सावंत (38), भरत ग्यानदेव पगार (47, दोघेही रा. सायने) व गोकुळ हिरामण शेवाळे (38, रा. लोणवाडे, ता. मालेगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. Also Read - Health Department Exam: आरोग्य विभागाची परीक्षा का रद्द झाली?, आरोग्यमंत्र्यांनी कारण सांगत विद्यार्थ्यांची मागितली माफी!