पुणे : पुण्यामध्ये (Pune) शुक्रवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली. मुंबई -बंगळुरु महामार्गावर (Mumbai-Bangluru Highway) नऱ्हे येथील नवले पुलाजवळ (Nawale Bridge) हा अपघात झाला. थिनर वाहतूक करणाऱ्या टँकरने 17 सीटर टेम्पो ट्राव्हलरला (Pune Accident) जोरदार धडक दिली. त्यानंतर या टँकरने इतरही वाहनांना धडक दिली. अपघातामध्ये टेम्पो ट्राव्हलर पलटी झाली. या अपघातामध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमी प्रवाशांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.Also Read - Pune Rape Case: पुणे पुन्हा हादरलं ! बर्थ-डे पार्टीला बोलावून तरुणीवर केला बलात्कार

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडे निघालेल्या थिनर टँकरने नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळ (Narhe Selfie Point) टेम्पो ट्राव्हलरला कट मारण्याच्या प्रयत्न केला. यावेळी टँकरने टेम्पो ट्राव्हलरला जोरदार धडक दिली. त्यामुळे टेम्पो ट्राव्हलर रोडच्या बाजूला असलेल्या पट्टीला धडकला. त्यानंतर टँकरने टेम्पो ट्राव्हलर आणि कंटेनर या दोन वाहनाही धडक दिली. या भीषण अपघातामध्ये पाच वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) तात्काळ घटनास्थळावर धाव घेत मदतकार्य सुरु केले. Also Read - Pune Water Supply: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरातील या भागांत गुरुवारी, शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद

अपघातामुळे या महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. रात्री उशिरा अपघातग्रस्त गाड्या रस्त्यावरुन बाजूला हटवण्यात आल्या. त्यानंतर या ठिकाणची वाहतूक सुरळीत झाली. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. तर 12 जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे या अपघातात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Also Read - Pune Crime : पुण्यात भरदिवसा 6 गोळ्या झाडून काँग्रेस कार्यकर्त्याची हत्त्या, भारती विद्यापीठ भागातील घटना