Malegaon Municipal Corporation: मालेगावातील महापौरांसह काँग्रेसच्या 30 पैकी 27 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Malegaon Municipal Corporation: राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत युती आणि आघाडीबाबात चर्चा रंगलेल्या असतानाच राष्ट्रवादीने काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. मालेगाव महापालिकेतील काँग्रेसच्या महापौरांसह 27 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Malegaon Municipal Corporation: राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत युती आणि आघाडीबाबात चर्चा रंगलेल्या असतानाच राष्ट्रवादीने काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. मालेगाव महापालिकेतील (Malegaon Municipal Corporation) काँग्रेसच्या महापौरांसह 27 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे मालेगावात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. राज्यात शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या तीन प्रमुख पक्षांच्या महाविकासआघाडीची (Maha Vikas Aghadi) सत्ता असली तरी अशा अनेक घटनांमधून या तिन्ही पक्षांमधील मदभेद समोर आले आहेत.
Also Read:
एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या 30 पैकी 27 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मालेगावच्या महापौर ताहिरा शेख यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या २७ नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यात आला.
Malegaon, Maharashtra: 27 corporators of the Congress party joined Nationalist Congress Party (NCP) today in the presence of party leader and Deputy CM Ajit Pawar. Malegaon Mayor Tahira Shaikh joined the party too. pic.twitter.com/XYVLLslEnw
— ANI (@ANI) January 27, 2022
मालेगाव महापालिकेत एकूण 84 जागा आहेत. 2017 च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 30 जागा मिळाल्या होत्या, तर राष्ट्रवादीला 20 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेने 12 जागा जिंकल्या आणि भारतीय जनता पक्षाने 9 जागा जिंकल्या होत्या. असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष AIMIM ला देकील मालेगावातील जनतेने पसंती दिली होती. एमआयएमने 7 जागांवर विजय मिळवला होता तर जनता दल सेक्युलरने देखील 7 जागा जिंकल्या होत्या.
विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील पक्षांची युती तुटणारच असं वाटत असतानाच असे प्रसंगही अनेकदा आले आहेत. विशेषत: अलीकडच्या काळात काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आघाडी धोक्यात आल्याच्या चर्चा रंगत आहेत. आता मालेगाव महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या