By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Pune Rape Case: शाळेमध्ये घुसून विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक!
Pune Rape Case: मंगेश तुकाराम पदुमले असे आरोपीचे नाव आहे. पांडवनगर येथील गुंजाळवाडींमध्ये तो राहतो. मंगेश हा शाळेजवळच्या एका शोरुमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.

Rape In Pune : शाळेमध्ये घुसून विद्यार्थिनीवर बलात्कार (Pune Rape Case) करणाऱ्या नराधमाच्या पुणे पोलिसांनी (Pune Police) मुसक्या आवळ्या आहेत. पुण्यातील जंगली महाराज रोडवरील शाळेतील शौचालयात एका 11 वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला होता. बुधवारी ही घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत शोध सुरु केला होता. अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी आरोपीला अटक (Accused Arrested) केली आहे. पुणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने आरोपीला जनवाडी येथील दारुच्या गुत्यावरुन अटक केली.
Also Read:
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश तुकाराम पदुमले असे आरोपीचे नाव आहे. पांडवनगर येथील गुंजाळवाडींमध्ये तो राहतो. मंगेश हा शाळेजवळच्या एका शोरुमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. गुरुवारी मंगेशने जंगली महाराज रोडवरील एका शाळेमध्ये घुसून 11 वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. विद्यार्थिनीने सांगितलेल्या वर्णावरुन पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र तयार करुन घेतले आणि त्याचा शोध सुरु केला. या रेखाचित्रात दिसणारा आरोपी हा शेजारील शोरुममध्ये एक दिवस सुरक्षारक्षक म्हणून कामाला आला असल्याची माहिती पोलिसांना मिळली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध सुरु करत आरोपीला जनवाडीतील एका दारुच्या गुत्यावरुन अटक केली.
दरम्यान, 11 वर्षीय पीडित विद्यार्थिनी पुण्यातील शिवाजीनगर येथील एका शाळेत शिक्षण घेत आहे. तिच्यावर बुधवारी शाळेतील शौचालयात बलात्कार करण्यात आला. सकाळी 11 वाजताच्या सुमारास पीडित मुलगी शाळेत असताना तिला एका 35 वर्षीय अज्ञात व्यक्तीने बोलण्यात अडकवले. या व्यक्तीने तिला ढकलत ढकलत शाळेच्या शौचालयात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर नराधमाने पीडितेला धमकी देखील दिली. ‘घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास तुला बघून घेईल, असे सांगून नराधम तेथून पसार झाला. घाबरेल्या अवस्थेत पीडित विद्यार्थिनी घरी पोहोचली. तिने तिच्या आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
पीडितेला सोबत घेऊन तिच्या पालकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपीविरोधात अज्ञात नराधमाविरुद्ध कलम 376 आणि POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आणि अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या बलात्काराच्या घटनेमुळे पुणे शहर हादरले असून मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.