मुंबई : मराठा क्रांती मोर्चा बुधवारी राज्याची राजधानी मुंबईत धडकला. या मोर्चासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत दाखल झाले होते. मोर्चा झाल्यानंतर आपल्या घराकडे निघालेल्या मोर्चेक-यांच्या गाडीला अपघात झाला आहे.

मोर्चेकरांच्या गाडीला औरंगाबाद जवळ अपघात झाल्याने त्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त मोर्चेकरी वाळुज महानगर येथील राहणारे होते.

या अपघातात तीनजण जखमी झाले असून त्यांना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, मुंबईतील वडाळा परिसरात संध्याकाळी ट्रकने दिलेल्या धडकेत चेंबूरच्या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता.

बुधवारी मुंबईमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव एकत्र आले होते.