Top Recommended Stories

Maratha Reservation : संभाजीराजे भोसलेंचे आमरण उपोषण सुरु, म्हणाले - 'माझा लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नाही तर...'

Maratha Reservation : आमरण उपोषणाला बसण्यापूर्वी संभाजीराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

Updated: February 26, 2022 1:51 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

chhatrapati sambhajiraje
chhatrapati sambhajiraje

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे भोसले (MP Sambhajiraje Bhosale) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी आजपासून आमरण उपोषणाला (Hunger Strike) सुरुवात केली आहे. संभाजीराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे ते आज मुंबईच्या आझाद मैदानात (Aazad Maidan) उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती (Saiyogitaraje Chatrapati) या देखील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. आमरण उपोषणाला बसण्यापूर्वी संभाजीराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र सरकारवर (Maharashtra Government) जोरदार निशाणा साधला.

Also Read:

आमरण उपोषणाला मी एकटाच बसणार –

आमरण उपोषणाला बसण्यापूर्वी संभाजीराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘आमरण उपोषणाला मी एकटाच बसणार आहे. मराठा समाजाला वेठीस धरु नये, असे आवाहन त्यांनी केले. मी एकटाच या उपोषणाला बसणार होतो, मात्र अनेकजण आले आहेत. मला पाठिंबा म्हणजे शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या घराण्याला पाठिंबा आहे. सगळ्यांना एका छताखाली आणता येईल या दृष्टीने माझा लढा आहे. माझा लढा हा 30 टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नाही तर गरीब मराठा समाजासाठी आहे. त्यांच्या आरक्षणासोबत इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा लढा आहे.’

You may like to read

आरक्षण हे आमच्या हक्काचे –

संभाजीराजे पुढे म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठा समाजाला सोबत घेऊन गेले नाहीत तस सर्व समाजाच्या बारा बलुतेदारांना सोबत घेऊन पुढे गेले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मला उपोषण करावे लागत आहे. आरक्षण मिळेपर्यंत गरिब मराठा समाजाने काय करायचे? असा सवाल देखील यावेळी संभाजीराजेंनी उपस्थित केला. ‘आरक्षण हे आमच्या हक्काचे आहे. माझ्यावर जबाबदारी आहे. आमरण उपोषण करणे कठीण काम आहे. परंतू, 2007 पासून हा मुद्दा मी पुढे नेत आहे. आता जर काही केले नाही तर काय उपयोग, म्हणून मी उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले.

…म्हणून मी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला –

‘मी 2007 पासून महाराष्ट्र फिरतोय. मी आजच टपकलो नहीये. मी शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने महाराष्ट्र पिंजून काढला. यातून आम्ही आरक्षण समाजाला का गरजेचं आहे याची जनजागृती केली होती. 2013ला मी महाराष्ट्रात फिरत असताना मराठा समाजाच्या संघटनांनी एकत्र येऊन सांगितलं की राजे तुम्ही नेतृत्व करणं गरजें आहे. त्यामुळेच 2013ला आझाद मैदानात आम्ही मोर्चा काढला होता. त्यानंतर नारायण राणे समिती स्थापन झाली. मी जी चळवळ सुरू केली आहे, त्यात समाजाला का वेठीला धरायचं? म्हणून मी ठरवलं, जे होईल ते होईल, आपण आमरण उपोषण करायला हवं. या मागण्यांसाठी मी स्वत: आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.’, असे संभाजीराजे भोसलेंनी सांगितले.

संयोगिताराजे छत्रपती आंदोलनात सहभागी –

संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती या देखील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘आज संभाजीराजे आमरण उपोषणाला बसले आहेत ही वेळ यायला नव्हती पाहिजे. पण सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे ही वेळ राजेंवर आली आहे. मी स्वतः शेवटपर्यंत या आंदोलनात सहभागी रहणार आहे.’

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 26, 2022 1:50 PM IST

Updated Date: February 26, 2022 1:51 PM IST