Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक, आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागणीसाठी खासदार छात्रपती संभाजीराजे हे आजपासून (26 फेब्रुवारी) मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसणार आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) प्रलंबित मागणीसाठी खासदार छात्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर (Azad maidan) आमरण उपोषण करणार आहेत. त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत उपोषणाबाबत माहिती दिली होती. छत्रपती संभाजीराजे (MP Sambhaji Raje) हे एकटे उपोषणास बसणार असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून (Maharashtra) त्यांना पाठींबा मिळत आहे. 11.30 वाजता ते आझाद मैदानावर पोहचणार आहेत. संभाजीराजे यांच्या या उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे. अनेक ग्रामपंचायत, विविध संघटना, तालीम संस्थामार्फत ग्रामीण, शहर, तालुका आणि जिल्हा पातळीवर बैठका होत असून बहुजन समाजाकडून देखील या आंदोलनास पाठींबा मिळत आहे.
Also Read:
- Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार! केंद्र सरकार सतर्क, राज्यातही टास्क फोर्स गठीत होणार
- Maharashtra Winter Session Highlights: सीमावादावरुन अधिवेशन तापलं! अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमनेसामने
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीतच! ते भाजपचेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात, NCPची खोचक टीका
आंदोलनाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र…
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी खासदार संभजीराजे यांनी आमरण उपोषणाची हाक दिली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आधीच पत्र लिहून सूचाना दिली आहे. तसेच महाराष्ट्रभरातून आंदोलनासाठी येणाऱ्या मराठा बांधवांना अटकाव करू नये असे ट्विट त्यांनी आज केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र पोलीस आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना टॅग केले आहे.
असा आहे कार्यक्रम…
- संभाजीराजे हे सकाळी 10.50 वाजता मरीन ड्रईव्ह येथून सर्व समन्वयकांसह हुतात्मा चौक येथे येणार आहे.
- 11 वाजता हुतात्मा चौक, मुंबई येथे हुतात्मा स्मारकास अभिवादन करतील.
- त्यानंतर 11.30 वाजता उपोषणस्थळी आगमन होत संभाजीराजे प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील.
- 11.30 वाजता संभाजीराजे उपोषणस्थळी छत्रपती शिवाजी महाराज, व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करून उपोषणास सुरुवात करतील.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या