Top Recommended Stories

MHADA Exam Update: म्हाडाची परीक्षा ऑफलाईनऐवजी ऑनलाईन पद्धतीने, 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार परीक्षा!

MHADA Exam Update : म्हाडाच्या परीक्षांकरिता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Updated: January 27, 2022 8:47 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

MHADA Exam Update
MHADA Exam Update

MHADA Exam Update : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) सरळ सेवा भरतीमध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील 565 पदे भरण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने होणारी परीक्षा (MHADA Offline Exam) आता ऑनलाईन पद्धतीने (MHADA Online Exam) होणार आहे. ही परीक्षा 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहे. ही परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांना म्हाडा प्रशासनातर्फे एक लिंक उपलब्ध करून दिली जाणार असून या लिंकवर उमेदवारांना त्यांचा पेपर उत्तरासह पाहता येणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर (Exam Center) ही परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हाडाच्या परीक्षांकरिता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती म्हाडाचे सचिव राजकुमार सागर (MHADA Secretary Rajkumar Sagar) यांनी दिली.

Also Read:

म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न (MHADA recruitment exam paper Leak) झाल्याने यापूर्वी म्हाडाला ऐनवेळी परीक्षा रद्द करावी लागली होती. यामुळे म्हाडाने ऑफलाइन ऐवजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार म्हाडाने वेळापत्रक जाहीर केले असून ही परीक्षा 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारी, 7 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी म्हाडाच्या https.mhada.gov. in या संकेतस्थळावर https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/31659/75245/login.html ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

You may like to read

तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया सोयीची ठरावी याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर मॉक लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. https://g06.tcsion.com:443//OnlineAssessment/index.html?31659@@M211 या मॉक लिंकद्वारे उमेदवारांना परीक्षेचे साधारण स्वरूप समजून घेता येणार असून ऑनलाईन परीक्षा कशी द्यावी याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर परीक्षा दिल्यानंतर सर्व उमेदवारांना म्हाडा प्रशासनातर्फे एक लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. या लिंकवर उमेदवारांना त्यांचा पेपर उत्तरासह पाहता येणार आहे. परीक्षेनंतर प्रश्नपत्रिका आणि उत्तर तालिकाबाबत काही आक्षेप असतील तर आक्षेप नोंदविण्याकरिता उमेदवारांना तीन दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. आक्षेपांबाबत निर्णय झाल्यानंतर, ज्या क्लस्टरकरिता एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा घेतली गेली आहे, त्या क्लस्टरकरिता नॉर्मालिसेशन प्रोसेस (https://www.mhada.gov.in/sites/default/files/Notification_for_Normalisation_MHADA_Recruitment_2021-dtd-14-1-2022.pdf) पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सागर यांनी दिली आहे.

म्हाडा प्रशासनाद्वारे सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की, म्हाडा सरळ सेवा परीक्षा प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक रित्या राबवत आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या, मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये आणि कोणत्याही गैरमार्गांचा अवलंब करू नये. अशा प्रकारे जर कोणी प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळल्यास अशा व्यक्तींची तक्रार म्हाडा प्रशासन, म्हाडा दक्षता व सुरक्षा विभाग किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 27, 2022 8:46 PM IST

Updated Date: January 27, 2022 8:47 PM IST