मुंबई: मुंबई-ठाण्यात तुम्ही हक्कांचं घर (Mhada lottery 2021) खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. सर्वसामान्यांना परवडणारी म्हाडाच्या घरांची (Mhada House) लॉटरी येत्या विजयादशमीला (Vijaya Dashami) अर्थात दसऱ्याला (Dasara) काढण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Udhav thackeray) यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारनं (Maharashtra Government) घेतला आहे. या लॉटरीच्या माध्यमातून एकूण 9000 घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Maharashtra Minister Jitendra Avhad) यांनी दिली आहे.Also Read - Shiv sena- Bjp Alliance: मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली माहिती अशी की, कोरोनाच्या उद्रेकामुळे म्हाडाच्या घरांची (Mhada House) लॉटरी पुढे ढकलण्यात आली होती. या लॉटरीअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana) येणारी 6500 घरे, कोकण मंडळ आवास परियोजनेअंतर्गत (Konkan Housing and Area Development Board) येणारी 2000 घरे आणि 20 टक्के योजनेअंतर्गत येणाऱ्या 500 घरांचा समावेश आहे. ठाणे, मीरारोड, वर्तकनगर, कल्याण, वडवली, गोथेघर आणि विरार बोळिंज नाका येथे घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या संदर्भात लवकरच जाहिरात काढण्यात येणार आहे. Also Read - Pornography Case: शिल्पा शेट्टीनं पोलिसांना सांगितली 'राज की बात', कुंद्राच्या अडचणीत वाढ?

कोकण मंडळाच्या लॉटरीद्वारे, ठाण्यातील वर्तकनगर येथे अल्प उत्पन्न गटासाठी 67 घरे उपलब्घ असणार आहेत. या घरांचे क्षेत्रफळ 320 चौरस फूट इतके असणार आहे. तर, या घरांची किंमत 38 ते 40 लाख इतकी असणार आहे. तर वडवलीत 29 घरे असणार आहेत. येथील घरांची किंमत 16 लाखांच्या आसपास असणार आहे. तर विरार येथे 1300 घरे असणार आहेत. यातील 1000 घरे ही अल्प उत्पन्न गट आणि उर्वरित घरे ही मध्यम उत्पन्न गटासाठी आहेत. Also Read - Breaking News Live Updates: पुण्यामध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी सर्व दुकानं बंद राहणार - अजित पवार

मीरारोड येथे मध्यम वर्गीयांसाठी टू बीएचकेची 196 घरे उपलब्ध होत आहेत. तसेच ठाण्यातील वर्तकनगरमध्ये 67 दुकानेही उपलब्ध होत आहेत. ही घरे निम्न आणि मध्यम वर्गीयांसाठी असणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.