मुंबई: म्हाडा-कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 8948 घरांची सोडत गुरुवारी सकाळी 10 वाजता जाहीर करण्यात आली आहे. ( MHADA Lottery Konkan Board 2021 Result) त्यामुळे दसऱ्याच्या (Dasara 2021) मुहूर्तावर अनेक कुटुंबीयांचं स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. कल्याण, मिरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत उभारलेल्या 8948 घरांच्या विक्रीसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची सोडत http://mhada.ucast.in या संकेतस्थळावरून काढण्यात आली.Also Read - India vs Pakistan: पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय, बाबर आझमच्या वडिलांना अश्रू अनावर, VIDEO होतोय VIRAL

ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. म्हाडाच्या लॉटरीतील 8948 घरांसाठी तब्बल 2 लाख 46 हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यामुळे या सोडतीची चूरसही वाढली होती. एकेक संकेत क्रमांकानुसार, ऑनलाइन सोडत काढण्यात आली. यावेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील (Union Minister Kapil Patil), नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (State Minister Eknath Patil), तसेच ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के (Thane Mayer Naresh Mhaske) आदी उपस्थित होते. तर गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) हे कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. Also Read - Digital Fraud: तुळजाभवानीच्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, श्रद्धेच्या नावाखाली घातला जातोय डिजिटल गंडा

ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात सोडत काढण्यात आली.तसेच प्रथम येणाऱ्यास प्राधान्य यानुसार 100 जणांना सभागृहात प्रवेश देण्यात आला होता. कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. सकाळी 10 वाजल्यापासून सोडतीला सुरुवात झाली. एकेका संकेत क्रमांकानुसार, ऑनलाइन सोडत काढण्यात आली. सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजेत्यांच्या नावांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. Also Read - Raj Thackeray Covid Positive: राज ठाकरेंनी आता तरी मास्क परिधान करावा; राष्ट्रवादीच्या नेत्याची विनंती

सोडतीचा निकाल 14 ऑक्टोबर, 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता https://lottery.mhada.gov,in आणि https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केला जाणार आहे, अशी माहिती कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली.

नितीन महाजन म्हणाले, कोकण मंडळाच्या सन 2021 च्या सोडतीतील इच्छुक अर्जदारांचे अर्ज सादर करतेवेळी 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या 12 महिन्यांच्या कालावधीतील सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरण्यात आलं आहे. त्यानुसार उपरोक्त कालावधीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न 25 हजार रुपयांपर्यंत, अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न 25,001 हजार रुपये ते 50 हजार रुपयांपर्यंत, तसेच मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न 50,001 रुपये ते 75 हजार रुपयांपर्यंत, उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न 75 हजार रुपयांपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 6180 सदनिका सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी शिरढोण (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे 624 सदनिका, खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे 586 सदनिका, सर्व्हे क्रमांक 162 खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे 2016 सदनिका, सर्व्हे क्रमांक 13 भंडारली (ता. जि. ठाणे) येथे 1769 सदनिका, गोठेघर (जि. ठाणे) येथे 1185 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.