MHADA Lottery 2022 : आनंदवार्ता! मुंबईकरांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार, दिवाळीत निघणार म्हाडाच्या 4000 घरांची लॉटरी

MHADA Lottery 2022 : म्हाडातर्फे दिवाळीत ४००० हजार घरासाठी सोडत निघणार आहे. पहाडी-गोरेगाव, अँटॉप हिल, विक्रोळी आणि कोळे-कल्याण या ठिकाणी ही घरं आहे. 

Published: August 23, 2022 12:03 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

आनंदवार्ता! मुंबईकरांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार, दिवाळीत निघणार म्हाडाच्या 4000 घरांची लॉटरी
आनंदवार्ता! मुंबईकरांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार, दिवाळीत निघणार म्हाडाच्या 4000 घरांची लॉटरी

MHADA Lottery 2022 : मुंबईकरांसाठी (Mumbai News) एक खूशखबर आहे. मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून लवकरच म्हाडाच्या 4000 घरांसाठी सोडत (Mhada Sodat 2022) निघणार आहे. गेल्या तीन वर्षांत म्हाडाने मुंबईतल्या घरांसाठी सोडत (MHADA Lottery) काढली नाही. मात्र आता प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. म्हाडाने दिवाळीत मुंबईमध्ये चार हजार घरांची लॉटरी काढण्यासाठी तयारी सुरु केली आहे. लवकरच त्याची अधिकृत घोषणा केली जाईल. पहाडी-गोरेगाव, अँटॉप हिल, विक्रोळी आणि कोळे-कल्याण या ठिकाणी ही घरं असतील.

याआधी म्हाडाने बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पातील घरांचा सोडतीत समावेश करू नये, असा निर्णय घेतला होता. मात्र आता येत्या सहा महिन्यांत किंवा वर्षभरात बांधकाम पूर्ण होऊन निवासी दाखला मिळू शकेल अशा घरांचा देखील सोडतीत समावेश करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईत घरांची किंमत खूपच महाग असून येथील घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे मुंबईत हक्काचे घर घेण्याचे स्वप्न अनेकांना धूसर वाटते. आर्थिक अडचणीमुळे इच्छा असून देखील ही महागडी घरं घेणे सर्वसामान्यांना शक्य होत नाही. मात्र म्हाडाच्या गृहप्रकल्प योजनेमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत हक्काच्या घराचे स्वप्न साकार होऊ शकतं. त्यानुसार म्हाडाने सोडतीची तयारी सुरू केली असून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. त्यानुसार या 4 हजार घरांची दिवाळीत सोडत प्रक्रिया राबविण्यात येईल.

या सोडतबाबत तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्वीट देखील केले होते. दरम्यान, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी दिवाळीत मुंबईतील अंदाजे चार हजार घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती दिली होती. त्यानुसार आता ही प्रक्रिया रावबिण्यात येत असून लवकरच या सोडतसंदर्भात मोठी घोषणा करण्यात येणार आहे. या सोडतमुळे मुंबईकरांना मोठा दिसाला मिळणार असून अनेकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

या ठिकाणी असेल घरं

सोडतसाठी सज्ज असलेली ही घरं पहाडी-गोरेगाव, अँटॉप हिल, विक्रोळी आणि कोळे-कल्याण या ठिकाणी आहे. एकूण 4000 घरासाठी ही सोडत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तब्बल तीन वर्षानंतर ही सोडत होत असल्याने अनेकांना या सोडतीची उत्सुकता आहे.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.