MHADA lottery Pune: पुण्यात मिळणार हक्काचे घर, म्हाडा लॉटरीची ऑनलाईन सोडत जाहीर

म्हाडाच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचा प्रारंभ 16 नोव्हेंबर रोजी करण्यात आला होता.

Updated: January 7, 2022 1:19 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Mhada Lottery Pune 2022
Mhada Lottery Pune 2022

MHADA lottery Pune: पुण्यामध्ये घर असावे असे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांची इच्छा आज पूर्ण होणार आहे. आज पुण्यामध्ये म्हाडाच्या घरांची ऑनलाईन लॉटरी सोडत जाहीर करण्यात आली. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (MHADA) अंतर्गत 2,823 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 1,399 सदनिका अशा एकूण 4,222 नवीन सदनिकांसाठी आज सोडत जाहीर करण्यात आली. सकाळी ही सोडत ऑनलाईन पद्धतीने (Online) जाहीर करण्यात आली. पुणे येथील जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांच्या हस्ते पुणे म्हाडाच्या 4,222 सदनिकांची ऑनलाईन लॉटरी सोडत (Online Lottery) पार पडली. म्हाडाच्या पुण्यातील घरांसाठीची (Pune MHADA House) सोडत आज जाहीर होणार असल्यामुळे घरासाठी अर्ज केलेल्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Also Read:

म्हाडाच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचा प्रारंभ 16 नोव्हेंबर रोजी करण्यात आला होता. या 4,222 सदनिकांसाठी 80,848 अर्जदारांनी अर्ज नोंदणी केली आहे. त्यापैकी 65,180 अर्जदारांनी अनामत रक्कम भरुन सोडतीमध्ये सहभाग नोंदविला आहे. यामधील काहींना आज पुण्यामध्ये हक्काचे घर मिळणार आहे. त्यामुळे यासर्व अर्जदारांमध्ये चांगालाच आनंद पाहायला मिळत आहे. या लॉटरीच्या निमित्ताने ज्यांना हक्काची घरे मिळणार आहेत, त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. तर इतरांनी निराश न होता, म्हाडाच्या पुढच्या सोडतीत भाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, ‘प्रत्येकाला हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे. पुणे म्हाडाच्या 4,222 नवीन सदनिकांची सोडत त्याच धोरणाच्या दिशेने पडलेले आश्वासक पाऊल आहे. सर्वांसाठी घर हा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकार प्राधान्याने राबविणार असून म्हाडाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, सामान्य माणसाला घर आणि बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. त्याचे चांगले परिणाम आता दिसायला लागले आहेत. कोरोना संकटकाळात मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा महत्वाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्यामुळे बांधकाम क्षेत्राला ऊर्जितावस्था मिळाली. राज्यातल्या सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. ‘सर्वांसाठी घरं’ कार्यक्रमांतर्गत सर्वांना हक्काची घरं देण्याचा प्रयत्न आहे. कोरोनामुक्तीसाठी लसीकरण हेच मोठे सुरक्षा कवच आहे. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 7, 2022 1:17 PM IST

Updated Date: January 7, 2022 1:19 PM IST