By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
MHADA Recruitment 2021: कागदपत्र जमा करु न शकलेल्या यशस्वी उमेदवारांना दिलासा, 21 जूनपर्यंत मुदतवाढ!
MHADA Recruitment 2021: म्हाडा प्राधिकरणाकडून (MHADA Authority) 565 रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून कागदपत्रे जमा करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पण या प्रक्रियेदरम्यान काही उमेदवारांना आपली कागदपत्रे जमा करता आली नाही. या उमेदवारांना म्हाडाने एक संधी देत दिलासा दिला आहे.
MHADA Recruitment 2021: म्हाडा सरळ सेवा -2021 (MHADA Straight Service Recruitment 2021) अंतर्गत जे उमेदवार यशस्वी झाले आहेत आणि त्यांना भरती प्रक्रियेसाठी कागदपत्रे वेळेत जमा करता आली नाहीत अशा उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. म्हाडाने या उमेदवारांना आणखी एक संधी दिली आहे. या उमेदवारांना आता त्यांची कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेसाठी मुदवाढ मिळाली आहे. हे उमेदवार आता 21 जूनपर्यंत कागदपत्रे जमा करु शकतात.
म्हाडा प्राधिकरणाकडून (MHADA Authority) 565 रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून कागदपत्रे जमा करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पण या प्रक्रियेदरम्यान काही उमेदवारांना आपली कागदपत्रे जमा करता आली नाही. या उमेदवारांना म्हाडाने एक संधी देत दिलासा दिला आहे. या उमेदवारांना म्हाडाकडून 21 जूनपर्यंत आपली कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत कागदपत्रे जमा करु न शकल्यास उमेदवारांना भरतीत स्वारस्य नाही असे समजून त्यांच्या नावाचा विचार करण्यात येणार नाही, असे म्हाडाने सांगितले आहे.
म्हाडा सरळ सेवा -2021 अंतर्गत परिक्षेमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना टप्प्याटप्प्याने कागदपत्रे सादर करण्यासाठी बोलवण्यात आले होते. या उमेदवारांची कागदपत्रे 6 आणि 7 जून, 9 आणि 10 जून, 14 आणि 15 जून तसेच 16 आणि 17 जूनला जमा करून घेण्यात आली होती. पण या कालावधीत अनेक उमेदवार आपली कागदपत्रे जमा करु शकले नाहीत. या उमेदवारांना म्हाडाने एक संधी देत. 21 जूनला सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत म्हाडा भवनात येऊन कागदपत्रे जमा करण्यास सांगितले आहे.