Top Recommended Stories

महाराष्ट्र स्टेट कॉमन एन्ट्रान्स टेस्ट सेलने वाढवली MHT CET 2022 साठी नोंदणीची अंतिम तारीख, असा करा अर्ज

MHT CET 2022: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलने MHT CET 2021 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. उमेदवारांना आता 15 एप्रिलपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. इच्छूक उमेदवार mhtcet2022.mahacet.org किंवा cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.

Updated: March 30, 2022 8:10 PM IST

By India.com News Desk | Edited by Chandrakant Jagtap

MHT CET 2023 exam date

MHT CET 2022 Registration : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची (CET Exam 2022) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलने (Maharashtra State Common Entrance Test Cell) MHT CET 2021 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. उमेदवारांना आता 15 एप्रिलपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. इच्छूक उमेदवार mhtcet2022.mahacet.org किंवा cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. याआधी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च होती.

Also Read:

MHT CET द्वारे महाराष्ट्रातील अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, फार्मसी आणि कृषी संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो. मात्र या परीक्षेचा भाग असलेल्या संस्थांमध्येच MHT CET द्वारे प्रवेश दिला जातो. वाढवलेल्या मुदतीसाठी उमेदवारांकडून कोणतेही विलंब शुल्क आकारले जाणार नाही. परंतु जे उमेदवार 15 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकणार नाहीत ते 16 ते 23 एप्रिलपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज सादर करू शकतात. उमेदवारांना विलंब शुल्क म्हणून 500 रुपये भरावे लागतील. उमेदवात थेट या लिंकवर https://mhtcet2022.mahacet.org/StaticPages/HomePage क्लिक करून अर्ज करु शकतात.

You may like to read

तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी MHT CET 2022 11 ते 28 जून 2022 या कालावधीत घेण्यात येईल. MHT CET 2022 PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) आणि PCB (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) या दोन ग्रुपमध्ये आयोजित केले जाते. (MHT CET 2022 Registration : Maharashtra State Common Entrance Test Cell Extends Registration Deadline for MHT CET 2022, Apply Now)

कोरोनामुळे दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या शिक्षण अनियमित झाले होते. ऑनलाइन शिक्षणात अनेक अडचणी येत होत्या. शैक्षणिक वेळापत्रक पूर्णत: कोलमडले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सर्वकाही सुरळीत होत आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालये ऑफलाइन सुरु झाले आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा देखील होणार आहे. या संदर्भात वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी MHT CET 2022 जूनमध्ये होणार आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या