Top Recommended Stories

शिवसेना खासदार Bhavana Gawali यांना ED चा समन्स, हजर न झाल्यास अटकेची टांगती तलवार!

Money laundering Case: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावले आहे. याआधी देखील ईडीने भावना गवळी यांना अनेक वेळा समन्स बजावले. पण भावना गवळी या काही कारणांमुळे चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे याप्रकरणी ईडीने भावना गवळी यांना पुन्हा समन्स बजावला असून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले.

Published: April 29, 2022 11:20 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Bhavana Gawali, Shiv Sena, MP, Money Laundering Case, Enforcement Directorate,
Bhavana Gawali, Shiv Sena, MP, Money Laundering Case, Enforcement Directorate,

Money laundering Case: शिवसेनेच्या (Shivsena) खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali) यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भावना गवळी यांनी ईडीने समन्स बजावले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये (Money laundering Case) ईडीने समन्स (ED Summons) बजावला आहे. समन्स पाठवत ईडीने भावना गवळी यांना पुढील आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. महत्वाचे म्हणजे ईडीने भावना गवळी यांना या आधी अनेकदा समन्स बजावले होते पण त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. जर यावेळी त्या चौकशीसाठी हजर न राहिल्यास ईडीकडून त्यांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट (Non-bailable warrant) काढण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात जात आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावले आहे. याआधी देखील ईडीने भावना गवळी यांना अनेक वेळा समन्स बजावले. पण भावना गवळी या काही कारणांमुळे चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे याप्रकरणी ईडीने भावना गवळी यांना पुन्हा समन्स बजावला असून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. जर यावेळी भावना गवळी ईडी कार्यालयात हजर झाल्या नाही तर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीकडून त्यांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट काढण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

You may like to read

मनी लॉन्ड्रिंगचे हे प्रकरण 1992 सालचे आहे. भावना गवळी यांचे वडील पुंडलीकराव गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्डाची पणन संचालकाकडे नोंद करून कारखान्याची स्थापना केली होती. त्यामुळे राज्य शासनाच्या हमीपत्रावर राष्ट्रीय सहकार निगमने बालाजी पार्टीकल बोर्डला 43 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. 2000 सालापर्यंत हा कारखाना फक्त उभा होता पण तो कधी सुरू झाला नाही. 2001 मध्ये भावना गवळी या कारखान्याच्या अध्यक्षा झाल्या. त्यानंतर 2002 मध्ये भावना गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची 14 हेक्टर जमीन बेकायदा पद्धतीने आपलीच दुसरी संस्था महिला उत्कर्ष प्रतिष्ठानला विकली. विशेष म्हणजे हा व्यवहार करण्यासाठी भावना गवळी यांनी शासनाची परवानगी घेतली नव्हती.

2007 मध्ये राज्य शासनाने हा कारखाना बालाजी पार्टीकल बोर्डला विकण्याची परवानगी दिली. तसेच भावना गवळी यांची लिक्विडेटर म्हणून नेमणूक करण्यात आली. हा कारखाना विकण्यासाठी जिल्हा उप निबंधकांने काही अटी लावल्या होत्या. 2010 मध्ये बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना भावना गवळी यांचे पीए अशोक गांडोळी यांचे 90 टक्के शेअर असलेल्या भावना ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेडला विकला. यासाठी रिसोड अर्बन क्रेडिट कॉ. बँकची 10 कोटीची बँक गॅरंटी घेत शासनाची परवानगी न घेता विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कारखाना विक्रीच्या व्यवहारामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हरीश सारडा यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी ईडीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ईडीने याप्रकरणी कारवाई करत भावना गवळी यांच्या वेगवेगळ्या ट्रस्ट आणि कंपन्यांचे व्यवहार सांभाळणाऱ्या सईद खान यांना अटक केली. आता ईडी याप्रकरणाच्या चौकशीसाठी भावना गवळी यांना बोलावत आहे पण त्या चौकशीसाठी हजर राहत नाहीत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.