Money Laundering Case: नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल
Money Laundering Case : नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Money Laundering Case : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या कोठडीत (ED Custody) असलेल्या नवाब मलिक यांची प्रकृती अचानक बिघडली. नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ जे जे रुग्णालयात (J J Hospital) दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Also Read:
Maharashtra Minister and NCP leader Nawab Malik admitted to JJ Hospital in Mumbai. Details awaited.
He has been remanded to ED custody till March 3, in connection with Dawood Ibrahim money laundering case.
(File photo) pic.twitter.com/NSGxiosJhM
— ANI (@ANI) February 25, 2022
सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने (ED) दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Dawood Ibrahim money laundering case) बुधवारी नवाब मलिक यांना अटक केली. नवाब मलिक यांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने त्यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली. ईडीच्या कोठडीत एक रात्र काढल्यानंतर नवाब मलिक यांची प्रकृती अचानक बिघडली. नवाब मलिकांना वैद्यकिय तपासणीसाठी आज जे जे रुग्णालयात आणण्यात आले होते. पण त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल (nawab malik admitted to j j hospital) करण्यात आले.
दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ईडीने दाऊद इब्राहीम आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ईडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ईडीला तपासात आढळून आले. त्यानुसार ईडीने बुधवारी मलिकांवर कारवाई करत त्यांना अटक केली.
दरम्यान, ईडी कोठडीत (ED Custody) असलेल्या नवाब मलिकांच्या तीन मागण्या कोर्टाने मान्य केल्या आहेत. नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयासमोर तीन मागण्या केल्या होत्या नवाब मलिक यांच्या तिन्ही मागण्या मुंबई सत्र न्यायालयाने मान्य केल्या आहेत. आपल्याला घरचे जेवण आणि औषधं मिळावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली होती. ती मागणी मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) मान्य केली आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या