मुंबई: मनी लाँडरिंग प्रकरणी (Money Laundering Case) अंमलबजावणी संचलनालय अर्थात ED ची धडक कारवाई सुरूच आहे. शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी (Shivsena MP Bhavana Gawali) ED च्या निशाण्यावर आहेत. खासदार भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान (Saeed Khan arrested) याला ED नं अटक केली असून त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. सईदला अटक झाल्यामुळे आता खासदार गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.Also Read - मी ज्ञानदेवच...! पण बायको प्रेमानं 'दाऊद' म्हणायची; समीर वानखेडेंच्या वडिलांचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर

‘एएनआय’ने (ANI) दिलेल्या वृत्तानुसार, खासदार भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिश सारडा ( Harish Sarada) यांनी भावना गवळी (Bhavana Gavali) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र, भावना गवळी यांनी ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती, असा दावा हरिश सारडा यांनी केला आहे. भावना अ‌ॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. Also Read - Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल आज पुन्हा महागलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Also Read - Photo of a Sweet Couple: नवाब मलिकांचा आणखी एक बॉम्ब, समीर वानखेडेंच्या 'निकाह'चा फोटो केला शेअर

भावना अ‌ॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून 7.5 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला 7.9 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप देखील सारडा यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी एका प्रकरणात खारदार भावना गवळी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विदर्भातील रस्तेबांधणीच्या कार्यक्रमात शिवसेनेचे काही नेते अडथळे आणत असल्याचं म्हटलं होतं. यावरुन किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांनी 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती.