मुंबई: नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (Monsoon 2021) आता चांगलाच वेग पकडला आहे. मान्सूननं मुंबईसह (Mumbai Rain) आता संपूर्ण महाराष्ट्र (Monsoon Alert Maharashtra) व्यापला आहे. पुढील 5 दिवस पावसाचे आहेत. मुंबईसह राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे. Also Read - Breaking News Live Updates: राज्यात आज 9,361 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 190 मृत्यू

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून (11 जून) पुढील पाच दिवस राज्यातील विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, आणि कोकण पट्ट्यात पावसाचा जोर अधिक राहील. तक मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पाऊस होण्याचा अंदाज आहे. याबाबत हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. Also Read - Breaking News Live Updates: 'फ्लाइंग शीख' मिल्खा सिंग पंचतत्त्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबईसह रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यामध्ये साधातर 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाला सज्ज राहण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

मराठवाड्यात नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात पुढील आजपासून चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भात ही काही जिल्ह्यात पावसाची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईत दाखल होताच मान्सूनच जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुंबईसह उपनगरत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विविध भागात अनेक पाणीच पाणी झालं आहे. या पाण्याचा रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यात मुंबईत भरतीची भीती व्यक्त केली जात आहे. समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.