Top Recommended Stories

MPSC Exam 2021 : MPSCच्या मुख्य परीक्षेसाठी प्रवेश प्रमाणपत्र जारी, 7 ते 9 मे दरम्यान होणार पेपर!

MPSC Exam 2021 : एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश प्रमाणपत्र बाळगणे आवश्यक असणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी हे प्रवेश प्रमाणपत्र एमपीएससीच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन त्याची प्रिंटआऊट काढून घेणे गरजेचे आहे.

Updated: April 29, 2022 7:58 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

MPSC संयुक्त मुख्य परीक्षा 2020
MPSC संयुक्त मुख्य परीक्षा 2020

MPSC Exam 2021 : एमपीएससीच्या परीक्षेची (MPSC Exam) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (MPSC Student) महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 साठी (MPSC Exam 2021) प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठी प्रवेश प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत. उमेदवार एमपीएससीची अधिकृत वेबसाईट (MPSC Website) http://mpsconline.gov.in ला भेट देऊन हे प्रवेशपत्र पाहून ते डाऊनलोड करु शकता. ही परीक्षा येत्या 7 ते 9 मे दरम्यान होणार आहे.

Also Read:

एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश प्रमाणपत्र बाळगणे आवश्यक असणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी हे प्रवेश प्रमाणपत्र एमपीएससीच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन त्याची प्रिंटआऊट काढून घेणे गरजेचे आहे. या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारेच त्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

You may like to read

महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 (MPSC Exam 2021) ही 7, 8 आणि 9 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. कोरोनाचा वेग मंदावला असला तरी कोरोना अद्याप संपला नाही. त्यामुळे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करणे विद्यार्थ्यांना आवश्यक आहे.

परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास आधी परीक्षा उपकेंद्रावर विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसंच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिर्वाय आहे.

दरम्यान, एमपीएससी परीक्षेसाठी प्रवेश प्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण आल्यास उमेदवाराला आयोगाच्या contact-secretary@mpsc.gov.in आणि support-online@mpsc.gov.in या ईमेलवर किंवा 1800 1234 274 किंवा 7303821822 या दूरध्वनी क्रमांकावर अधिक मदत मिळवू शकता.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या