MPSC Result 2022: MPSCची पूर्व परीक्षा 2021चा निकाल जाहीर, मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर!
MPSC Result 2022: या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमाकांसह नावांची यादी आणि गुणांची कट ऑफ जाहीर करण्यात आली आहे. एमपीएससीची वेबसाईट https://mpsc.gov.in यावर निकाल जाहीर करण्यात आला आहे

MPSC Result 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 23 जानेवारी 2022 रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षा 2021चा निकाल (MPSC Exam Result 2022) जाहीर करण्यात आला आहे. बुधवारी रात्री हा निकाल जाहीर करण्यात आला. या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमाकांसह नावांची यादी आणि गुणांची कट ऑफ जाहीर करण्यात आली आहे. एमपीएससीची वेबसाईट (MPSC Website) https://mpsc.gov.in यावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी थेट एमपीएससीच्या वेबसाईटला भेट देऊन निकाल पाहू शकतात. त्याचसोबत एमपीएससीकडून मुख्य परीक्षेच्या तारखा (MPSC Main Exam Dates) देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.
Also Read:
पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने (Online) केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पात्रता तपासण्यांच्या अटीच्या अधून राहून पूर्व परीक्षेच्या निकालाच्या (MPSC Pre Exam Result) आधारावर मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमाकांवर एसएमएसद्वारे माहिती देण्यात येईल. त्याचप्रमाणे एमपीएससीकडून मुख्य परीक्षेच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.
मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी ऑलाइनपद्धतीने आवश्यक माहिती आणि परीक्षा फी 31 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीमध्ये सादर करायची आहे. त्याशिवाय उमेदवाराला मुख्य परीक्षेसाठी पात्र असल्याचे समजले जाणार नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा 7 मे, 8 मे आणि 9 मे 2022 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला 544 रुपये परीक्षा फी भरावी लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवाराला 344 रुपये परीक्षा फी भरावी लागणार आहे. मुख्य परीक्षा अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे. तर राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 मधून एकूण 405 पदांची भरती केली जाणार आहे.