MPSC Recruitment 2022: अत्यंत महत्त्वाची माहिती! राज्यसेवा आयोगाकडून अर्ज करण्याच्या तारखेत वाढ

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक खूशखबर आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून 900 रिक्त पदांसाठी बंपर भरती केली जात आहे.

Published: January 15, 2022 12:02 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

MPSC Recruitment 2022: अत्यंत महत्त्वाची माहिती! राज्यसेवा आयोगाकडून अर्ज करण्याच्या तारखेत वाढ

MPSC Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या (Sarkari Naukari) शोधात असलेल्या तरुणांसाठी एक खूशखबर आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून (mpsc bumper vacancy) 900 रिक्त पदांसाठी बंपर भरती केली जात आहे. विविध पदांसाठी अर्ज (Govt Jobs In Maharashtra) मागवण्यात आले आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज (Online Apply of Govt job) करू शकतात. अर्ज करण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. राज्यसेवा आयोगाकडून अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे.

Also Read:

उमेदवार आता 17 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. आधी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 होती. आयोगाकडून त्यात वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in वर लॉगिन करून उमेदवार अर्ज करू शकतात.

या पदांसाठी मागवण्यात आले आहेत अर्ज…

– क्लर्क (मराठी) टाइपिस्ट – 473
– टॅक्स असिस्टेंट – 117
– डेप्युटी इन्स्पेक्टर – 114
– इंडस्ट्री इन्स्पेक्टर – 103
– क्लर्क (इंग्रजी ) टाइपिस्ट – 79
– टेक्निकल असिस्टेंट – 14

निवड प्रक्रिया-

मुलाखत/चाचणी.

अर्ज शुल्क –

– खुला प्रवर्ग – रु. 394/-
– मागासवर्गीय – रु. 294/-

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा..

अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता असावी. विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in वर लॉगिन करून नोटिफिकेशन पाहू शकतात.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 ते 38 वर्षेदरम्यान असावे.

महत्त्वाच्या तारखा…

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17 जानेवारी.
पूर्व परीक्षेची संभाव्य तारीख – 03 एप्रिल.
मुख्य परीक्षेची संभाव तारीख- 06 ते 17 ऑगस्ट​

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 15, 2022 12:02 PM IST