Top Recommended Stories

MPSC Recruitment 2022: MPSCमध्ये 900 पदांसाठी बंपर भरती, अर्ज करण्यासाठी 5 दिवस शिल्लक, तात्काळ करा अर्ज!

MPSC Recruitment 2022: या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 60 हजारांपासून ते 1 लाखांपर्यंत पगार मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे, नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असणार आहे.

Updated: January 27, 2022 9:28 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

MPSC Recruitment 2022
MPSC Recruitment 2022

MPSC Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या (Sarkari Naukari) शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून (mpsc bumper vacancy) 900 रिक्त पदांसाठी बंपर भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार 31 जानेवारी 2022 पर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज (MPSC Recruitment 2022) करु शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी फक्त 5 दिवस शिल्लक राहिलेत त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.

Also Read:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फेत (MPSC) 900 रिक्त विविध पदांसाठी अर्ज (Govt Jobs In Maharashtra) मागवण्यात आले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज (Online Apply of Govt job) करू शकतात. इच्छुक उमेदवार (Bumper Vacancy) अर्ज करण्यासाठी एमपीएससीची अधिकृत वेबसाईट mpsconline.gov.in वर जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकतात. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 60 हजारांपासून ते 1 लाखांपर्यंत पगार मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे, नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असणार आहे. त्यामुळे उमेदवाराला राज्यभरात कुठेही पोस्टिंग मिळणार आहे. एमपीएससीच्या अधिकृत नोटिफिकेशननुसार, विविध पदांसाठी 3 एप्रिल 2022 रोजी पूर्व परीक्षा होणार आहे. यात उत्तीर्ण झालेले उमेदवार 6 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत.

You may like to read

महत्त्वाच्या तारखा –

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 जानेवारी 2022.
पूर्व परीक्षेची संभाव्य तारीख – 03 एप्रिल 2022.
मुख्य परीक्षेची संभाव तारीख – 06 ऑगस्ट​ 2022

अर्ज शुल्क –

– खुला प्रवर्ग – रु. 394/-
– मागासवर्गीय – रु. 294/-

अशी राहिल भरती प्रक्रिया –

उद्योग निरीक्षक गट क – 103 पदं

पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी/ डिप्लोमा
वयोमर्यादा – 19 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षितांसाठी 43 वर्षांपर्यंत)
पगार – 35,400 रुपये ते 1,12,400 रुपये.

दुय्यम निरीक्षक गट क – 114 पदं

पात्रता – कोणतेही पदवीधर
वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षितांसाठी 43 वर्षांपर्यंत)
पगार – 32,000 रुपये ते 1,01,600 रुपये.

तांत्रिक सहाय्यक गट क – 14 पदं

पात्रता – कोणताही पदवीधर
वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षितांसाठी 43 वर्षांपर्यंत)
पगार – 29,200 रुपये ते 92,300 रुपये.

कर सहाय्यक गट क – 117 पदं

पात्रता – कोणतेही पदवीधर / टायपिंग
वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षितांसाठी 43 वर्षांपर्यंत)
पगार – 25,500 रुपये ते 81,100 रुपये.

लिपिक (मराठी) टंकलेखक गट क – 473 पदं

पात्रता – कोणतेही पदवीधर/ टायपिंग
वयोमर्यादा – 19 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षितांसाठी 43 वर्षांपर्यंत)
पगार – 19,900 रुपये ते 63,200 रुपये.

लिपिक (इंग्रजी) टंकलेखक गट क – 79 पदं

पात्रता – कोणतेही पदवीधर / टायपिंग
वयोमर्यादा – 19 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षितांसाठी 43 वर्षांपर्यंत)
पगार – 19,900 रुपये ते 63,200 रुपये.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 27, 2022 9:27 AM IST

Updated Date: January 27, 2022 9:28 AM IST