By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
MPSC Result : एमपीएससी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर,असा तपासा तुमचा स्कोअर
MPSC Result : राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 च्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना हा निकाल पाहता येणार आहे.

MPSC Result : राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 च्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर (STATE SERVICES MAIN EXAMINATION RESULT 2020) करण्यात आला आहे. एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना हा निकाल पाहता येणार आहे. लेखी परीक्षेच्या निकालानंतर आता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. तसेच मुलाखतींमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल मोबाईलवर कळवण्यात येणार आहे.
एमपीएससी लेखी परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांना या लिंकवरू https://mpsc.gov.in/downloadFile/english/4714 जाऊन संपूर्ण निकाल पाहता येणार आहे. या मुख्य परीक्षेत मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठवून कळवण्यात येणार आहे. मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल असे देखील कळवण्यात आले आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 (जा. क्र. 60/2021) लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. pic.twitter.com/sWG4ZpfJkK
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) March 25, 2022
या निकालानुसार पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. एमपीएसीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार उमेदवारांनी हे लक्षात ठेवा की अर्ज दाखल करताना दिलेली माहिती खोटी किंवा चुकीची आढळून आल्यास किंवा उमेदवाराने मुलाखतीवेळी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाऊ शकते.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या