Top Recommended Stories

MPSC Result: MPSC च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर! प्रमोद चौगुले, रुपाली माने राज्यात प्रथम

MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ( MPSC )घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षा 2021 च्या अंतिम निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर (MPSC Result ) करण्यात आली. या परीक्षेत सांगालीच्या प्रमोद चौगुले (Pramod Chaughule ) यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर रुपाली माने (Rupali Mane ) यांनी महिलांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला.

Published: April 30, 2022 9:29 AM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

MPSC Result: MPSC च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर! प्रमोद चौगुले, रुपाली माने राज्यात प्रथम

MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ( MPSC) घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षा 2021 च्या अंतिम निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर (MPSC Result ) करण्यात आली. या परीक्षेत सांगालीच्या प्रमोद चौगुले (Pramod Chaughule ) यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर रुपाली माने (Rupali Mane ) यांनी महिलांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला. आयोगाने पात्र उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम शुक्रवारी संपविला.  मुलाखती संपल्यानंतर काही तासातच निकाल जाहीर करण्यात आला आहे. आयोगाच्या इतिहासात प्रथमच एवढ्या लवकर निकाल जाहीर झाला आहे.

Also Read:

कोरोनामुळे चार वेळा पुढे ढकलली परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून डिसेंबर 2019 मध्ये 15 संवर्गातील 200 पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एप्रिल 2020 मध्ये परीक्षा घेण्याचे आयोगाचे नियोजन होते. मात्र करोनाच्या संकटामुळे  परीक्षा चार वेळा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर मार्च 2021 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली. पूर्व परीक्षेसाठी 2 लाख 62 हजार 891 उमेदवारांनी नोंदणी केली,  तर 1 लाख 71 हजार 116 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.

You may like to read

पूर्व परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2021 मध्ये जाहीर करण्यात आला. 3 हजार 214 उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 863 उमेदवारांनी डिसेंबर 2021 मध्ये मुख्य परीक्षा दिली. त्यातून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या 615 उमेदवारांपैकी 597 उमेदवारांनी मुलाखत दिली. त्यानंतर 18 ते 29 एप्रिल दरम्यान मुलाखती घेऊन अंतिम निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

प्रमोद चौघुलेंचे वडील आहे टेम्पो चालक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत 612 गुण मिळवून प्रथम आलेले प्रमोद चौघुले यांची हालाकीची परिस्थिती आहे. वडील टेम्पो चालक तर आई शिवणकाम करते. अशा पारिस्थितीत प्रमोद यांचा प्रवास हा सोपा नव्हता. कोरोना काळात सांगलीत पूर होता. तेव्हाच प्रमोद यांच्या घरातील सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. अशा बिकट पारिस्थितीत एकटे अभ्यास करत प्रमोद यांनी ही यश मिळविले आहे. प्रमोद यांनी 2015 पासून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. यश अपयश आलेख तरी त्यांनी जिद्द सोडली नाही. गेल्या परीक्षेत त्यांचा क्रमांक एक मार्काने हुकला होता. आता ते थेट राज्यातून पहिले आले आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 30, 2022 9:29 AM IST