By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Mumbai Accident: मुंबईत भरधाव ट्रकने कुटुंबाला चिरडलं, बहिण-भावांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी
Mumbai Accident: मुंबई-दहिसर रस्त्यावर शनिवारी रात्री हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त गुप्ता कुटुंब हे मुळचे पंजाब येथील रहिवासी आहेत. ते मुंबई येथे परत येत होते. रस्ता ओलांडत असताना काळाने या कुटुंबियांवर घाला घातला.

Mumbai Accident: मुंबईमध्ये भीषण अपघाताची (Mumbai Accident) घटना समोर आली आहे. भरधाव ट्रकने (Truck Accident) कुटुंबाला चिरडले. दहिसर मार्गावर (Dahisar Road) हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये आई आणि मुलीचा समावेश आहे. अपघातातील जखमींवर मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात (Shatabdi Hospital) उपचार सुरु आहेत. दोघांची देखील प्रकृती चिंताजनक आहे.
Also Read:
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-दहिसर रस्त्यावर शनिवारी रात्री हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त गुप्ता कुटुंब हे मुळचे पंजाब येथील रहिवासी आहेत. ते मुंबई येथे परत येत होते. रस्ता ओलांडत असताना काळाने या कुटुंबियांवर घाला घातला. भरधाव ट्रकने संपूर्ण कुटुंबाला चिरडले. अपघातात चौघे जण देखील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या अपघातामध्ये गुप्ता कुटुंबियातील बहिण आणि भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला. तर आई आणि मोठी मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Mumbai Police) घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तर मृत्यू झालेल्या बहिण भावांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघातातील जखमी आई आणि मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास दहिसर पोलिसांकडून सुरु आहे.