Mumbai Building Fire: ताडदेवमध्ये 20 मजली इमारतीला भीषण आग, 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 15 जखमी
Mumbai Building Fire: नाना चौक परिसरातील भाटिया रुग्णालयाजवळील कमला नावाच्या इमारतीला ही आग लागली आहे. सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

Mumbai Building Fire : मुंबईतल्या ताडदेव परिसरात इमारतीला भीषण (Building Fire) आग लागल्याची घटना घडली आहे. 20 मजली इमारतीच्या 18व्या मजल्यावर ही भीषण आग लागली. नाना चौक (Nana Chowk) परिसरातील भाटिया रुग्णालयाजवळील (Bhatia Hospital) कमला नावाच्या इमारतीला (Kamala Building) ही आग लागली होती. सकाळी 7च्या सुमारास इमारतीला आग लागली. या आगीमध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 15 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) 13 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन ही आग विझवली.
Also Read:
Maharashtra | A level 3 fire broke out in 20 storeys Kamala building near Mumbai’s Bhatia hospital in Tardeo. 13 fire engines are present at the spot; more details awaited.
— ANI (@ANI) January 22, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, ताडदेव परिसरातील कमला इमारतीला सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. 20 मजली इमारतीच्या 18 व्या मजल्यावर ही आग लागली. ही लेव्हल 3 ची आग असून आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी 13 फायर इंजिनच्या सहाय्याने आग विझवली. इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. या आगीमध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले. जखमींवर नायर रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे तर इतरांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरु आहेत.
अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली. आग लागलेल्या 18 व्या मजल्यावर बरेच काही जण अडकले होते त्यांना देखील सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. ही आग नेमकी कशामुळे लागली यामागचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) , भाजप आमदार मंगल प्रभात लोढा (BJP MP Mangal Prabhat Lodha) यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या