Mumbai Cold Weather: मुंबईकर गारठले! तापमान 16 अंशावर, हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर
Mumbai Cold Weather: येत्या तीन ते चार दिवस थंडीचा प्रभाव असाच कायम राहणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Mumbai Cold Weather: देशात थंडीची लाट (Cold Wave) पसरली असून राज्यातील तापमानात देखील मोठी घट झाली आहे. या थंडीचा परिणाम मुंबईवर दिसून येत आहे. थंडीमुळे मुंबईकर अक्षरश: गारठले (Mumbai Cold Weather) आहेत. मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे (unseasonal rains) तापमानात मोठी घट झाली आहे. मुंबईतील अनेक भागात किमान 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. येत्या तीन ते चार दिवस थंडीचा प्रभाव असाच कायम राहणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी (meteorologists) व्यक्त केले आहे.
Also Read:
पाकिस्तानातील (Pakistan) धूळीचे वादळ गुजरातमार्गे (Gujarat) महाराष्ट्रात (Maharashtra) येऊन धडकले आहे. त्याचा परिणाम म्हणून मुंबईतील अनेक भागातील हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहचला आहे. हवेमध्ये मोठ्या प्रमाणात धुलिकण साचल्यामुळे दृश्यमानता देखील कमी झाली आहे. सोमवारपर्यंत धुलीकण हवेत कायम राहणार आहेत. मुंबईमध्ये थंडी चांगलीच पसरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईतील यावर्षीची थंडी जास्त आहे. मुंबईत दरवर्षी ऐवढी थंडी नसते पण यावर्षी थंडीमुळे मुंबईकर गारठले आहेत. गेल्या दहा वर्षांतील मुंबईतील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद रविवारी झाली आहे. मुंबईमध्ये सहा ते सात अंशानी कमाल तापमानात घट झाली आहे.
पुढील तीन ते चार दिवस मुंबईसोबतच राज्यातील तापमानात घट होईल, असे भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) सांगण्यात आले आहे. राज्यात मागील 24 तासांपासून पावसाचे वातावरण (Rainy weather) होते. आता वातावरणात गारवा देखील आहे त्यामुळे तापमानात घट झाल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. राज्यात धुके आणि धुळीची स्थिती सोमवापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर रात्रीच्या कमाल तापमानात मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे. राज्याच्या बहुतांश भागांत कडाक्याच्या थंडीची चिन्हे आहेत. उत्तरेकडील राज्यांच्या किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी घट होणार असून तेथील थंड वारे राज्यात दाखल होऊन किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी घट होणार असल्याने थंडी आणखी वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या