मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ बंधनकारक करण्यात आले आहे. आठवड्यातून किमान दोन दिवस ‘वंदे मातरम्’ म्हटले जावे, असा ठराव आज पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला. भाजप नगरसेवक संदीप पटेल यांनी याबाबत ठरावाची सूचना मांडली होती.

मद्रास हायकोर्टाने एक आदेश देत तामिळनाडूतील शाळा-कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्ये ‘वंदे मातरम्’ बंधनकारक करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा आधार घेत भाजप नगरसेवक संदीप पटेल यांनी मुंबई महापालिका शाळांमध्ये आठवड्यातून किमान दोन दिवस ‘वंदे मातरम्’ बंधनकारक करण्याची मागणी करणारी ठरावाची सूचना मांडली होता.

शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालयांमध्येही वंदे मातरम् गाण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं भाजप आमदार राज पुरोहित म्हणाले होते. ‘आम्हाला देशातून बाहेर काढा, पण खरा मुसलमान कधीच वंदे मातरम् गाणार नाही. मी ‘वंदे मातरम्’चा सन्मान करतो. मात्र माझा धर्म मला वंदे मातरम् म्हणण्याची परवानगी देत नाही. मग कारवाई करा, किंवा जेलमध्ये टाका’ असं अबू आझमी म्हणाले होते.

काहीच दिवसांपूर्वी मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूतील सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून किमान एकदा तरी वंदे मातरम् गाण्याची किंवा वाजवण्याची सक्ती केली.