Top Recommended Stories

Mumbai Corona: मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही कोरोना रुग्णसंख्या 20 हजारांच्या वरच, जाणून घ्या अपडेट्स

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी धडकी भरवणारी कोरोना रुग्णसंख्या समोर आली आहे.

Published: January 7, 2022 8:58 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

India Registers 1.41 Lakh New Covid Cases Today, 21% Higher Than Yesterday
Representational Images

Mumbai Corona Update: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाचा (Coronavirus) विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत चालला आहे. मुंबईत (Mumbai news) आज सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारांच्यावर कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहे. गेल्या 24 तासांत 20971 नवे रुग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत. तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 8490 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या मुंबईत 91731 एवढे सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, गुरूवारी मुंबईत 20181 नव्या कोरोना रुग्णांची नोंद घेण्यात आली होती. शुक्रवारी रुग्णसंख्येत 800 ने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट (Corona Hotspot) होताना दिसत आहे.

Also Read:

महापौरांनी दिले मिनी लॉकडाऊनचे संकेत…

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी धडकी भरवणारी कोरोना रुग्णसंख्या समोर आली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या 20 हजारापर्यंत गेली तर लॉकडाऊनचा विचार करावा लागले, असे संकेत आधीच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी दिले होते. महापौरांनी आज या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला. आज महापौरांनी यावेळी मिनी लॉकडाऊनचे (Mini Lockdown) संकेत दिले.

You may like to read


मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, पण नागरिकांनी काळजी घ्यावी. काही नागरिक मात्र बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. मुंबईकरांनी घाबरून न जाता कोरोना निर्बंधांचे काटेकोरपणे पालण करावे, असे आवाहन देखील महापौरांनी दिले आहेत. कठोर निर्बंध लागू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शरद पवार याबाबतचा निर्णय घेतील. नवी नियमावली आज रात्री किंवा उद्यापर्यंत जाहीर होईल, अशी माहिती देखील महापौरांनी दिली आहे.

दुसरीकडे, कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन सुद्धा चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉनला आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी बस्टूर डोस (Booster Dose) देण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत येत्या 10 जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात होणार आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर तसेच 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. बूस्टर डोस देण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

दुसऱ्या डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेले असल्यास ते तिसऱ्या डोससाठी पात्र असतील. ऑनलाईन आणि नोंदणी पद्धतीने ही सुविधा उपलब्ध होणार आहे. 60 वर्षांवरील वयाच्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींना बूस्टर डोस देताना लसीकरण केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र जमा किंवा दाखवायची आवश्यकता नाही, फक्त अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा. या सर्व नागरिकांना शासकीय केंद्रावर लस विनामूल्य देण्यात येणार आहे. वरील कोणत्याही नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असल्यास केंद्र सरकारने घोषित केलेल्या किंमतीत लस मिळेल.

कोरोना प्रतिबंधक ज्या लसीचे दोन डोस तुम्ही घेतले असतील तीच लस बूस्टर डोससाठी देण्यात येणार आहे. म्हणजेच जर तुम्ही कोव्हॅक्सिन लसीचे पहिले दोन डोस घेतले असतील तर तुम्हाला बूस्टर डोसही कोव्हॅक्सिनचाच देण्यात येईल. त्याचप्रमाणे कोव्हिशिल्डचे दोन डोस घेतले असतील तर तुम्हाला बूस्टर डोस कोव्हिशिल्ड लसीचाच दिला जाईल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 7, 2022 8:58 PM IST