Mumbai Corona Updates: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 20 हजारांचा आकडा

एकट्या मुंबई शहरात कोरोना रुग्णांचा आकडा 20 हजारांवर पोहोचला आहे.

Updated: January 6, 2022 9:16 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

mask mandatory again in train travel
mask mandatory again in train travel

Mumbai Corona Updates: मुंबईकरांच्या चिंतेत आणखी वाढ करणारी माहिती समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईला पुन्हा एकदा कोरोनाचा (Mumbai Corona Update)विळखा बसला आहे. गुरुवारी धडकी भरणारी कोरोनाबाधित रुग्णांची (Corona patients)आकडेवारी समोर आली आहे. एकट्या मुंबईत (Mumbai news) गुरुवारी 20181 नवे रुग्ण समोर आले तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 79,260 वर पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे धारावीत 117 कोरोना रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट (Corona Hotspot) होताना दिसत आहे. नवी मुंबईत गुरुवारी 2151 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे, राज्यात गेल्या 24 तासांत 36265 नवे रुग्णांची भर पडली असून 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 8,907 जणांनी गुरुवारी कोरोनावर मात केली आहे.

Also Read:

राज्यात गेल्या24 तासांत नवे ओमिक्रॉनबाधित (Omicron) 79 रुग्ण आढळले आहेत. आता राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 876 वर पोहोचली आहे. यापैकी 381 लोक पूर्णपणे बरे झाले आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असली तरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे.

Mumbai reports 20,181 new cases of COVID19, 4 deaths today; Active caseload stands at 79,260 pic.twitter.com/JyL5edG0Uz

एका दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत 5 हजारांनी वाढ..

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत (Mumbai Corona Update) झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. शहरात कोरोनाचा स्फोट झाला आहे. मुंबईत बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कोरोना रुग्णसंख्येत तब्बल 5 हजाराने वाढ झाली आहे. एकट्या मुंबई शहरात कोरोना रुग्णांचा आकडा 20 हजारांवर पोहोचला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धारावीत देखील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी धारावीत 117 नव्या रुग्णांच नोंद झाली आहे.

मुंबईकरांची भीती आणखी वाढली..

देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या भीतीत आणखी वाढ झाली आहे. धारावीत गुरुवारी 107 नव्या कोरोना रूग्णांची भर पडली आहे. धारावीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 444 झाली आहे.

दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरुवातील मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा आलेख उंचावत चालला आहे. मुंबईत 1 जानेवारीला 6347 रुग्ण आढलेले होते. 2 जानेवारीला 8063, 3 जानेवारीला 8082, 4 जानेवारीला 10860, 5 जानेवारीला 15166 आणि 6 जानेवारीला म्हणजे आज सुमारे 20181 नवे रुग्ण आढळले आहेत.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: January 6, 2022 8:36 PM IST

Updated Date: January 6, 2022 9:16 PM IST