Mumbai Corona Updates: मुंबई लोकल ट्रेन बंद होणार? वीकेंड लॉकडाऊनबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री
मुंबईसह राज्यात कोरोना व्हायरसचा पुन्हा एकदा विस्फोट झाल्याने चिंता वाढली आहे.

Mumbai Corona Updates: मुंबईसह राज्यात कोरोना व्हायरसचा (Corona virus in Mumbai) पुन्हा एकदा विस्फोट झाल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या (Omicron) रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात वीकेंड लॉकडाऊन (Weekend lockdown in mumbai) लावण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईत लोकल ट्रेन (Mumbai local Train) बंद होणार का? असा सवाल देखील मुंबईकरांना पडला आहे. मात्र, राज्यात वीकेंड लॉकडाऊनचा (Weekend Lockdown in Maharashtra) सध्या कोणताही विचार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashtra Health minister Rajesh Tope) यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मुंबई लोकल ट्रेन (Mumbai local Train) बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असे देखील आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
Also Read:
राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. परंतु, हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णाचे प्रमाण कमी आहे. मुंबईसह राज्यातील 80 टक्के बेड्स रिकामे आहेत. ऑक्सिजनची देखील मागणी वाढलेली नाही, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि आरोग्य विभागाची (Health Department) बैठक झाली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यात लॉकडाऊनचा सध्या कोणताही विचार नाही तसेच मुंबई लोकल ट्रेन बंद करण्याबाबत देखील निर्णय घेणार नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या राज्यात कोरोनाची काय परिस्थिती आहे. त्यावर खबरदारीचे काय उपाय आणि निर्बंध आहेत. त्याची अंमलबजावणी होत आहे का? याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. निर्बंधाची अंमलबजावणी होत नसेल तर आणखी कठोर करण्याचे आदेश यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बिगर अत्यावश्यक सेवांमुळे मुंबईसह राज्यात रुग्णसंख्येत वाढ होत असेल तर या सेवा बंद करण्यावर देखील चर्चा झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. मॉल्स, रेस्टॉरंटमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे तिथे कठोर निर्बंध करता येतील काय? याबाबत शरद पवार हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
शरद पवार घेणार बूस्टर डोस
शरद पवार यांनी कोरोना लसीचे दोन्ही लस घेऊन 9 महिने उलटले आहेत. त्यामुळे शरद पवार येत्या 10 जानेवारी ते बूस्टर डोस घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच राज्यात लसीकरण वाढवण्याबाबत देखील चर्चा झाली. याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सूचना देण्यात आल्या आहेत.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या