By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Mumbai Crime: तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त, 7 जणांच्या टोळीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
Mumbai Crime: मुंबई शहरात बनावट चलनी नोटा छापून त्या दैनंदिन व्यवहारात आणल्या जाणार असल्याची माहिती मुंबई क्राईम ब्रँचला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

Mumbai Crime: मुंबई क्राईम ब्रँचने (Mumbai Crime Branch) दहिसर (Dahisar) येथे मोठी कारवाई करत बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. भारतीय चलानाच्या (Indian currency) बनावट नोटा (Fake notes) छापून त्या वितरीत करण्याच्या उद्देशाने आलेल्या आंतरराज्यीय टोळीला (Interstate gang) मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली आहे. 7 जणांच्या या टोळीकडून तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा (7 Crores Fake Notes Seized) जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट नोटा मुंबईच्या बाजारात (Mumbai Market) चलनात आणण्याचा या टोळीचा डाव मुंबई क्राईम ब्रँचने उधळवून टाकला आहे. क्राईम ब्रँचने जप्त केलेल्या सर्व नोटा या 2 हजारांच्या आहेत. बनावट नोटांसंदर्भातील मुंबईतील आतापर्यंत ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात बनावट चलनी नोटा छापून त्या दैनंदिन व्यवहारात आणल्या जाणार असल्याची माहिती मुंबई क्राईम ब्रँचला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपल्या गोपनीय बातमीदारांमार्फत याप्रकरणाची सर्व माहिती काढून घेतली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि ज्या गाडीतून नोटा आणण्यात आल्या होत्या त्या गाडीची झडती घेतली. या गाडीमध्ये 2000 रुपयांच्या नोटांचे 250 बंडल आढळून आले. या कारवाईमध्ये पोलिसांनी 2 हजार रुपयांच्या एकूण 25 हजार नोटा जप्त केल्या. या नोटांसह आरोपींकडे असलेल्या वस्तू जप्त करत पोलिसांनी कारवाई ही केली.
मुंबई क्राईम ब्रँचने या टोळीकडून 7 कोटी रुपये, 7 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल (Mobile), एक लॅपटॉप (Laptop), आधार कार्ड (Aadhar Card), पॅनकार्ड (PAN card), वाहन चालक परवाना (Driving license), निवडणूक आयोगाचे ओळखपत्र (Election Commission Identity Card) आणि 28 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहेत. दहिसर परिसरात ही कारवाई करत मुंबई क्राईम ब्रँचने या टोळीतील सात जणांना अटक केली आहे. पोलिसांनी या याप्रकरणी सविस्तर पंचनामा करत सातही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु असून सातही जणांची कसून चौकशी सुरु आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या