Top Recommended Stories

Mumbai Crime: धक्कादायक!प्रेमप्रकरणातून एकाच कुटुंबातील तिघींची हत्या करत मारेकऱ्याने केली आत्महत्या

Mumbai Crime: मुंबईतील कांदिवलीत एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आहे. धक्कदायक म्हणजे मारेकऱ्याने देखील आत्महत्या केली आहे. घरात चार मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड झाले असावे, असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

Published: June 30, 2022 2:18 PM IST

By India.com News Desk | Edited by पी.संदीप

Amravati murder, Amravati case, nupur sharma, udaipur killing, amravati killing, maharashtra, maharashtra news
Umesh Kolhe was stabbed to death on June 21 near Ghantaghar in Shyam chowk area of Amravati. (Representational Image)

Mumbai Crime: मुंबईतील कांदिवली (Kandivali) भागात चार मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.चार पैकी तीन मृतदेह एकाच कुटुंबातील आहेत. मृतदेहांमध्ये दोन मुली आणि एका महिलेचा समावेश आहे. किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी आणि शिवदयाल सेन अशी मृतांची नावे आहेत. प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज मुंबई पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी चारही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले असून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड झाल्याचे तपासात उघड झाले आहे. शिवदयाल सेन हा दळवी कुटुंबीयांचा ड्रायव्हर होता. शिवदयाल याने तिघी मायलेकींची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:ही आत्महत्या केली.

You may like to read

तपासात समोर आली धक्कादायक माहिती…

शिवदयाल हा दळवी कुटुंबीयांकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याचे तीन जणींपैकी एकीसोबत प्रेमसंबंध होते. ड्रायव्हरसोबतच्या प्रेमसंबंधाची माहिती कुटुंबातील इतरांना समजली होती. त्यावरून घरात सतत वाद होत होते. या वादाला हिंसक वळण लागल्याने हे हत्याकांड घडले असावे, अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेतले असून ते पोस्टमार्टमसाठी शताब्दी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.

शिवदयालच्या खिशात सापडली सुसाईड नोट…

पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट देखील सापडली आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून एक धारदार शस्त्र जप्त केले आहे. भूमीवर आपलं प्रेम होतं.प्रेम प्रकरण घरातील इतरांना समजले होते. त्यावरून सतत वाद होत होते. त्यामुळे आपण तिघींच्या हत्या केली आणि स्वत:आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे शिवदयाल याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत लिहिलेले आहे.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>