मुंबई – असे म्हणतात की, पती-पत्नीचं नातं हे जन्मा-जन्मांच असत. एकमेकांना सुख दु:खात साथ देण्याची शपथही पती-पत्नी लग्नात घेत असतात. मुंबईतील एका महिलेने ही शपथ केवळ थपथच न ठेवता सत्यात बदल करुन दाखवली आहे. अंधेरी येथे राहणारे सी. मुरलीधरन यांची किडनी निकामी झाली होती त्यामुळे त्यांच्यावर रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट करुन ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.

मुरलीधरन यांची किडनी निकामी झाली होती. त्यामुळे किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुरलीधरन यांच्या पत्नी लीना यांची किडनी मुरलीधरन यांच्या किडनीशी जोडणारी असल्याने त्यांनी किडनी देण्याचं ठरवलं. त्यानंतर गरजेच्या असलेल्या चाचण्या करण्यात आल्या आणि मग, मुंबईतील एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये रोबोटिक तंत्राद्वारे त्यांचे किडनी ट्रान्सप्लांट केले गेले.

मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल हे रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट करणारे राज्यातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे. अशाप्रकारे रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट केलेले मुंबईतील मुरलीधरन हे पहिलेच रुग्ण असून या पद्धतीने शस्त्रक्रिया करणा-या देशातील इतर शहरांच्या यादीत आता मुंबईचा समावेश झाला आहे. (हे पण पाहा: सॉल्ट केव्ह आशिया, भारतामधील पहिलं ब्रीदींग सेंटर)

अंधेरीत राहणारे मुरलीधरन यांची किडनी फेल झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या मते, मुरलीधरन यांना तात्काळ किडनी ट्रान्सप्लांट करण्याची गरज होती. मात्र, किडनी डोनरची संख्या कमी असल्याने वाट पहावी लागली. अखेर मुरलीधरन यांच्या पत्नी लीना यांनी किडनी देण्याचा निर्णय घेतला. लीना यांनी सांगितले की, “माझे पती गेल्या दिड वर्षांपासून डायलिसिसवर होते. त्यामुळे त्यांना किडनी देण्याचा निर्णय मी घेतला.”

हॉस्पिटलच्या डॉ. श्रुती टापियावाला यांनी सांगितले की, पारंपारिक किडनी ट्रान्सप्लांटच्या तुलनेत रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट अधिक सुरक्षित असतं. रुग्ण शस्त्रक्रियेनंतर लवकर रिकवर होतो आणि वेदनांही कमी होतात.