नवी दिल्ली : कोरोनाचा (Corona virus) प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने बऱ्याच जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनचे (Lockdown) नियम शिथिल केले आहेत. राज्यातील 11 जिल्हे सोडून इतर जिल्ह्यामध्ये सोमवारपासून कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. पण राज्य सरकारने (Maharashtra Government) सर्वसामान्यांना मुंबई लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करण्यास अद्याप परावानगी दिली नाही. त्यामुळे मुंबईकारंनी नाराजी व्यक्त केली आहे. याच दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister of State for Railways Raosaheb Danve) यांनी मुंबई लोकलबाबत मोठे विधान केले आहे. लोकलबाबत ठाकरे सरकारने (Thackeray Government) लोकांच्या मागण्यांचा विचार करावा. ठाकरे सरकार तयारी दाखवेल त्याक्षणी सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी देऊ, असे त्यांनी सांगितले.Also Read - Breaking News Live Updates: महिला लसीकरण विशेष सत्रात मुंबईमध्ये 1.27 लाख महिलांनी घेतली लस

रावसाहेब दानवे म्हणाले की, ‘ठाकरे सरकारने आता राज्यातील निर्बंध शिथिल केल्याचा आधार घेत केंद्र सरकारला (Central Government) रेल्वे पूर्ववत सुरु करण्याची विनंती केली तर आम्हाला काही अडचण नाही. राज्य आपली भूमिका जाहीर करत नाही तोपर्यंत केंद्र सरकार (Modi Government) यामध्ये काहीही हस्तक्षेप करणार नाही. कारण शेवटी राज्य कोरोना स्थिती हाताळत आहे.’ तसंच, राज्य सरकारने कोरोना परिस्थिती (Corona situation) आटोक्यात आली असल्याचे सांगत रेल्वे वाहतूक सुरु करण्याची विनंती केल्यास आम्ही परवानगी देऊ, असे रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. Also Read - BKC Flyover Collapsed: बीकेसी पूल दुर्घटना प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार: एकनाथ शिंदे

कोरोनामुळे (Corona virus) गेल्या दीड वर्षांपासून सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा (Mumbai local) बंद आहे. त्यामुळे मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार याकडे मुंबईकरांचे (mumbaikar) लक्ष लागले आहे. राज्य सरकारने सोमवारपासून इतर निर्बंधामध्ये सूट दिली. पण मुंबई लोकलबाबत सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. त्यामुळे आता तरी सामान्य नागरिकांसाठी सरकारने लोकल सुरु करावी याबाबत मागणी केली जात आहे. त्याचसोबत सरकारने लोकल प्रवासाबाबत निर्णय न घेतल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे. Also Read - Shiv sena- Bjp Alliance: मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण