मुंबई: मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Pandemic) आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सरकारनं अत्यावशक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) प्रवासाची मुभा दिली आहे. मात्र, लोकलनं प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास बंदी आहे. त्यामुळे चाकरमान्यांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवासाची परवानगी देण्यात यावी, यासाठी प्रवाशांसोबतच विविध प्रवासी संघटनांकडून मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर ज्या लोकांनी कोरोनाप्रतिबंधक लशीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस घेतले आहेत, अशा प्रवाशांना लोकलमधून प्रवासाची परवानगी मिळू शकते.Also Read - Maharashtra Political Crisis : शिंदे गटाचा आता आदित्य ठाकरेंच्या युवासेनेवरही डोळा! एकनाथ शिंदेंकडून राज्य कार्यकारिणी जाहीर

लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाईन (Lifeline) संबोधलं जातं. मुंबई ट्रेन बंद असल्यानं अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्याचबरोबर चाकरमान्यांची मोठी गोची झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून आतापर्यंत लोकल ट्रेन सामान्य नागरिकांसाठी बंद आहे. लोकांना बस आणि इतर वाहतूक साधनांचा वापर करावा लागत आहे. परंतु, सर्व ठिकाणी मोठी गर्दी होताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरलं आहे. Also Read - Dussehra Melava 2022 : खरी शिवसेना कोणाची? दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरू झालं पोस्टर वॉर

व्यापारी संघटनांच्या मागणीनंतर सरकारनं दिले संकेत…

मुंबईतील काही व्यापारी संघटनांनी कोरोना प्रतिबंधक डोस घेतलेल्या लोकांना लोकल ट्रेनमधून प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी एक महिन्याआधी केली होती. अनेक व्यापाऱ्यांना रस्तेमार्गानं जावं लागत आहे. मात्र, यात वेळेचा अपव्यय होत आहे. शिवाय आर्थिक फटका देखील बसत आहे. दुसरीकडे, विविध प्रवाशी संघटनांनी सोशल मीडियावर कँपेन देखील सुरू केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना लोकमधून प्रवास करण्यात परवानगी दिली जाईल, असे संकेत दिले होते. Also Read - Mumbai local garba: ए हालो! मुंबई लोकलमध्ये महिलांनी लुटला गरब्याचा आनंद, पाहा व्हिडिओ

दरम्यान, दररोज लाखो लोक लोकल ट्रेनने प्रवास करतात. त्यामुळेच मुंबई लोकल लाईफलाईन असं म्हटलं जातं. कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना प्रवासाची परवानगी दिल्यास लस घेणाऱ्यांच्या लोकांची देखील संख्या वाढेल, असंही बोललं जात आहे.