Top Recommended Stories

Mumbai Local Mega Block : प्रवाशांनो कृपया लक्ष असू द्या! मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Local Mega Block : विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी 24 एप्रिल म्हणजे आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये मेगाब्लॉक असणार आहे. तर हार्बर रेल्वे मार्गावर 11.05 ते 4.05 या कालावधीमध्ये मेगाब्लॉक असणार आहे.

Published: April 24, 2022 8:08 AM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

मेगाब्लॉक
मेगाब्लॉक

Mumbai Local Mega Block: हार्बर ( Harbor Railway ) आणि मध्य रेल्वे मार्गावरुन (Central Railway) प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी (Mumbaikar) महत्वाची बातमी आहे. आज तर तुम्ही मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण मध्य (Central Railway Mega Block) आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक (Harbour Railway Mega Block) घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी 24 एप्रिल म्हणजे आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये मेगाब्लॉक असणार आहे. तर हार्बर रेल्वे मार्गावर 11.05 ते 4.05 या कालावधीमध्ये मेगाब्लॉक असणार आहे.

Also Read:

मध्य रेल्वे मार्गावर असा असणार मेगाब्लॉक –

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे डाउन धिम्या मार्गावर वळवल्या जातील. घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.

You may like to read

हार्बर मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक –

पनवेल ते वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकरीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणारी तथा ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

दरम्यान, मेगाब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल गाड्या चालविण्यात येतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मेगाब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील असे देखील रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: April 24, 2022 8:08 AM IST