By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Mumbai Local Mega Block : प्रवाशांनो कृपया लक्ष असू द्या! मध्य रेल्वे मार्गावर रविवारी 12 तासांचा मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक
Mumbai Local Mega Block : रविवारी मध्यरेल्वे मार्गावर रेल्वे रुळाची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी 12 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दिवा स्थानकाजवळ विविध तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai Local Mega Block : रविवारी म्हणजे 27 मार्चला जर तुम्ही मध्य रेल्वे मार्गावरुन (Central Railway) लोकलने प्रवास करण्याची योजना आखत असाल तर जरा थांबा. कारण रविवारी लोकलने प्रवास करणे तुम्हाला त्रासदायक ठरेल. रविवारी मध्यरेल्वे मार्गावर रेल्वे रुळाची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी 12 तासांचा मेगाब्लॉक ( Mega blocks) घेण्यात येणार आहे. दिवा स्थानकाजवळ विविध तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते कल्याण अप, डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक (Central Railway Mega Block) असणार आहे. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल 12 तासांचा हा मेगाब्लॉक असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. मध्य रेल्वेसोबतच ट्रान्स हार्बर (Trans Harbour Railway Mega Block) आणि पश्चिम रेल्वे मार्गावर (Western Railway Megablock) देखील मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मेगाब्लॉकच्या दिवशी सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद लोकल सकाळी 7.55 ते रात्री 7.50 वाजेपर्यंत मुलुंड ते ठाणे, कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. तर कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद लोकल सकाळी 7.36 ते रात्री 7.50 वाजेपर्यंत कल्याण ते मुलुंड दरम्यान अप धिम्या मार्गावर चालवण्यात येतील. या मार्गावरील लोकल 10 ते 15 मिनिटं विलंबाने धावणार आहेत. तर काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ठाणे ते वाशी अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर देखील मेगाब्लॉक असणार आहे. 26 मार्चला रात्री 11.45 ते २७ मार्चला पहाटे 5.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते वाशी, नेरूळ, पनवेल दरम्यानच्या अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावर देखील मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही. 26 मार्चच्या रात्री 11.45 वाजल्यापासून ते पहाटे 4.45 वाजेपर्यंत बोरिवली ते अंधेरी स्थानकादरम्यान दोन्ही जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या