Top Recommended Stories

Mumbai Local News : मुंबईकरांना मोठा दिलासा! AC लोकलच तिकीट झालं कमी

Mumbai Local News : मुंबईकरांना मोदी सरकारने ( Modi Government ) मोठा दिलासा दिला आहे. मोदी सरकारच्या निर्णयानंतर एसी लोकल ट्रेनचे तिकीट दर कमी करण्यात ( railway board cuts fare of tickets for AC local trains ) आले आहे.

Published: April 29, 2022 4:48 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Mumbai Local News : मुंबईकरांना मोठा दिलासा! AC लोकलच तिकीट झालं कमी
लंबी दूरी की ट्रेनों में मिलेगी सुविधा

Mumbai Local News : मुंबई लोकल (Mumbai Local Train ) संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुम्हीही लोकलने प्रवास करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायद्याची आहे. राज्यात उष्णतेची लाट ( Heat Wave ) कायम असून नागरिक हैराण आहे. अशातच उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोदी सरकारने ( Modi Government ) मोठा दिलासा दिला आहे. मोदी सरकारच्या निर्णयानंतर एसी लोकल ट्रेनचे तिकीट दर कमी करण्यात ( railway board cuts fare of tickets for AC local trains ) आले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचा लोकल प्रवास गरेगार होणार आहे.

याबाबत रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी संगितले की, रेल्वे बोर्डाने मुंबईत एसी लोकल ट्रेनच्या भाड्यात 50 टक्के कपात केली आहे. या निर्णयाला मंजूरी मिळाली आहे. त्यानुसार एसी लोकलच सध्या कमीत कमी भाडं 65 रुपयांवरुण 30 रुपयांवर आलं आहे.

You may like to read

लोकल ट्रेनला मुंबईची ‘लाईफ लाईन’ म्हटलं जातं. मात्र सध्या राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट आहे. मुंबईत देखील तापमानाने कहर केला असून तापमान 40 अंशाच्या जवळपास पोहचले आहे. उषणाता वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून एसी ट्रेनची मागणी वाढली आहे. असहाय्य अशा या उन्हात एसी लोकलने प्रवास करण्यास मुंबईकर पसंती देत आहे. यामुळे ट्रेनमध्ये बसायला सुध्दा जागा मिळत नसल्याची स्थिती साध्या लोकल ट्रेनच्या बाबतीत घडली आहे.

मुंबईत 2017 मध्ये एसी लोकल ट्रेनला सुरुवात झाली. भारतात ही पहिली एसी लोकल ट्रेन होती. ही पहिली एसी ट्रेन बोरिवली-चर्चगेट मार्गावर धावली होती.

 देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आनंद

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णायचे स्वागत करत आनंद व्यक्त केला. त्यांनी संगितले की, एसी लोकल तिकिटाचे दर कमी करण्याची मागणी होती. आता तिकिटाचे दर 50 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतीवरुण राज्य सरकारवर निशाणा साधत, राज्यातील ठाकरे सरकारचा दृष्टोकोन लहान आहे. ज्या राज्यात भाजपची सरकार आहे, त्या ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी आहे, असे ते म्हणाले.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.