मुंबई : मुंबई लोकल सेवा येत्या 15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केले आहेत त्यांना 15 ऑगस्टापासून लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार आहे. यासाठी त्यांना नजीकच्या रेल्वेस्थानकातून आजपासून पास उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 53 उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील स्थानकांचा देखील समावेश आहे. या सर्व स्थानकांवर मिळून 358 मदत कक्ष आहे. त्यामुळे दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांनीच पास घेण्यासाठी यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Documentation And Procedure For Mumbai Local Pass: What documents are required for Local Pass? How to get Local pass? )Also Read - Mumbai Local Online Pass: मुंबईकरांनो लोकल प्रवासासाठी ऑनलाईन सुद्धा मिळणार पास, सरकारने लाँच केले पोर्टल

असा मिळेल पास…

 1. मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी आजपासून ऑफलाईन पद्धतीने पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अॅपची संपूर्ण प्रक्रिया सुरु झाल्यानंतर ऑनलाईन पास उपलब्ध होईल.
 2. मुंबई एमएमआर विभागात एकूण 109 लोकल रेल्वे स्थानकांवर पाससाठी ऑफलाईन पडताळणी सुविधा उपलब्ध असेल.
 3. ज्यांना कोविड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहेत अशा नागरिकांना पास मिळणार
 4. दुसरा डोस घेतल्याच्या वैध प्रमाणपत्राची प्रत आणि फोटो असलेले ओळखपत्र पुरावा म्हणून नजीकच्या रेल्वे स्थानकावर जावे लागेल. तेथे पास उपलब्ध करून दिली जाईल.
 5. वरील दोन्ही किंवा यातील एक कागदपत्रं नसेल तर रेल्वे स्थानकावर प्रशासनाकडून प्रवेश नाकारण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
 6. पडताळणीमध्ये दोन्ही कागदपत्रं वैध असल्याचे निश्चित झाल्यानंतर कोविड प्रमाणपत्रासह फोटो ओळखपत्र पुराव्याच्या प्रतीवर देखील विहित नमुन्यातील शिक्का मारण्यात येईल.
 7. शिक्का मारलेले कोविड अंतिम प्रमाणपत्र रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीवर सादर करावे. त्यानुसार मासिक रेल्वे प्रवास पास देण्यात येईल. या पासवरून प्रवासाची सुविधा 15 ऑगस्टनंतरच वैध असेल.
 8. कोणीही बनावट लसीकरण प्रमाणपत्र सादर करण्याचा प्रयत्न केला तर अशा व्यक्तिंविरुद्ध साथरोग नियंत्रण कायदा / आपत्कालीन व्यवस्थापन कायदा / भारतीय दंडविधान संहिता यानुसार कठोर पोलीस कार्यवाही करण्यात येईल.
 9. अत्यावश्यक सेवेतील शासकीय / निमशासकीय आणि इतर कर्मचारी यांना सध्याच्या पद्धतीनुसारच प्रवासाठी मुभा असेल. त्यांनी कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असोत किंवा नसोत त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा राहील.
 10. ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु असून त्याला आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत ऑफलाईन प्रक्रिया सुरु राहणार आहे.
 11. पात्र नागरिकांनी घरानजीकच्या रेल्वे स्थानकांवर जावे. मात्र विनाकारण गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.

(Documentation And Procedure For Mumbai Local Pass: What documents are required for Local Pass? How to get Local pass? What is the process for Local pass? Mumbai Local Pass, Documentation For Local Pass, Local Pass Procedure, documents required for Local Pass, How to get Local pass, What is the process for Local pass,) Also Read - Mumbai Local Pass Kuthe Milel: मुंबईकरांनो आजपासून नजीकच्या स्टेशनवर मिळणार लोकलचा पास, या महत्त्वाच्या बाबी ठेवा लक्षात

Also Read - Mumbai Local Start From 15 August: मोठी बातमी! 15 ऑगस्टपासून लोकल सुरू होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा, केवळ यांनाच करता येणार प्रवास