मुंबई : मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी (Mumbai Local News) आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मुंबईकरांना येत्या 15 ऑगस्टपासून लोकल रेल्वेने  (Mumbai Local start from 15 August) प्रवास करता येणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात दोन्ही डोस (Both doses of the vaccine) घेऊन 14 दिवस झालेल्यांना प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी 15 ऑगस्टपासून रेल्वे प्रवास सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे अनेक दिवसांपासून लोकल सेवा (Mumbai Local) सुरु होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या चाकरमान्यांसह सामान्य मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.Also Read - Terror Module Busted: मुंबई लोकलमध्ये विषारी गॅसचा हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन, चौकशीतून माहिती उघड!

स्वातंत्र्यदिनापासून म्हणजेच 15 ऑगस्टपासून मुंबईची लाइफलाईन (Mumbai’s lifeline) पुन्हा सुरू होणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात लसीचे दोन्ही डोस (Both doses of vaccine) घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनाच लोकलने प्रवास (Mumbai Travel) करता येणार आहे. नागरिकांना लोकलने प्रवास करण्यासाठी सर्वात आधी संबंधीत अॅपवर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. नागरिकांनी नोंदणी केल्यानंतर मोबाईलवरच अॅपद्वारे लोकलचा पास उपलब्ध होणार आहे. तसेच, ज्यांच्याकडे मोबाइल नाही त्यांना पालिका कार्यालयात पास उपलब्ध असणार आहे. येत्या दोन दिवसात या अॅपचा तपशील जाहीर होईल असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी यावेळी स्पष्ट केले. Also Read - Shiv sena- Bjp Alliance: मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

असा मिळणार पास (How To Get Local Pass)

  • लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार
  • दुसऱ्या डोसनंतर 14 दिवस पूर्ण केलेल्यांनाच प्रवास करण्यास मुभा
  • स्मार्टफोनवर अॅपद्वारे रेल्वे पास डाऊनलोड करण्याची सुविधा
  • स्मार्टफोन नसल्यास प्रभाग कार्यालये, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर फोटो पासेस मिळणार
  • पासवर क्यूआर कोड असेल. यामुळे पासची अधिकृतता कळणार

Also Read - Breaking News Live Updates: PM मोदींच्या वाढदिवशी लसीकरण अभियानाचा रेकॉर्डब्रेक, 2 कोटी लोकांना दिली लस

बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुंबईतील लोकल सेवा (Local services in Mumbai) सुरू करण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, “अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी लोकल प्रवासास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. मात्र, अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे. केंद्र सरकारने देखील याबाबत इशारा दिलाय. मात्र अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंधांसह सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्यास मुभा देत आहोत. कुणीही अवैधरित्या किंवा बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावे आणि नंतरच प्रवास करावा” अशी विनंतीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे. (Mumbai Local start from August 15 In the first phase, those who have completed 14 days with both doses are allowed to travel)