मुंबई : मुंबईकरांना मोठा दिलासादायक वृत्त आहे. राज्य सरकारनं ठरवून दिलेल्या अनलॉकच्या (Maharashtra Unlock) निकषानुसार मुंबईसह उपनगराचा पॉझिटिव्हिटी रेट (Corona Positivity Rate) 5 टक्क्यांच्या आत आला आहे. राज्य सरकारनं या आठवड्यातील सर्व जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटची यादी जाहीर केली आहे. त्यात मुंबई आणि मुबई उपनगरांचा पॉझिटिव्हीटी रेट सध्या 4.40 टक्के इतका आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना लवकरच लोकल प्रवासाची (Mumbai Local Train News Update) मुभा मिळण्याची शक्यता आहे. Also Read - Breaking News Live Updates: देशात कोरोनाचा वेग मंदावला, 80 दिवसांनी 60 हजारांहून कमी रुग्णांची नोंद

देशासह राज्यात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत चालला आहे. रुग्णसंख्येत देखील मोठी घट दिसून आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तर नव्या कोरोनाबांधित रुग्णांची संख्या हजाराच्या आत आहे. तर मृतांचा आकडा देखील खाली आला आहे. विशेष म्हणजे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण दुपटीनं वाढलं आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अनलॉकच्या निकषानुसार लवकरच लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांना प्रतिक्षा असलेल्या लोकल प्रवासाला देखील परवानगी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. Also Read - Breaking News Live Updates: 'फ्लाइंग शीख' मिल्खा सिंग पंचतत्त्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राज्य सरकारनं गेल्या आठवड्यात अनलॉकचे पाच टप्पे (Maharashtra Unlock) ठरवले आहे. पहिल्या टप्प्यात येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्ह्यात काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मुंबई अनलॉक करण्यात येईल असं, मदत व पर्यवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली होती. मात्र, एक आठवड्यातच मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट सध्या 4.40 टक्कांवर खाली आला आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यासोबतच सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाला परवानगी मिळेल की नाही, हे पुढील एक ते दोन दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. Also Read - Breaking News Live Updates: मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

काय आहेत राज्य सरकारचे अनलॉकचे निकष?

राज्य सरकारनं लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यासाठी उपलब्ध ऑक्सिजन बेड आणि पॉझिटिव्ही रेट असे निकष ठरवले आहेत. पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांच्या आत असणाऱ्या जिल्ह्यातच लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात येतील, असे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. प्रत्येक आठवड्यातील पॉझिटिव्ही रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धतेबाबत आढावा घेऊन स्थानिक प्रशासन निर्णय घेणार आहे.