Top Recommended Stories

Mumbai Local Train: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवर 5 दिवसांचा 'मेगा ब्लॉक'

पश्चिम रेल्वेने (western railway) प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे. पालघर-वनगाव मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे पश्चिम रेल्वेच्या काही रेल्वे गाड्यांवर ( Train) परिणाम होणार आहे.

Published: February 25, 2022 1:50 PM IST

By India.com News Desk | Edited by Vikas Chavhan

Mumbai Local Train: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवर 5 दिवसांचा 'मेगा ब्लॉक'
Mumbai Local ac train News

Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेने (western railway) प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे. पालघर-वनगाव मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे पश्चिम रेल्वेच्या काही रेल्वे गाड्यांवर ( Train) परिणाम होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गवर जास्त थांबे देण्यात येणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर 5 दिवस ब्लॉक (Mega block) घेण्यात आला आहे. तुम्ही देखील या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी असाल तर तुमची गैरसोय टाळण्यासाठी जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणत्या वेळी हा ब्लॉक असणार आहे.

Also Read:

28 फेब्रुवारीपर्यंत राहील ब्लॉक…

पश्चिम रेल्वे मार्गावर हा ब्लॉक 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आला आहे. या कालावधीत दररोज सकाळी 10.10 ते 11.10  यावेळेत हा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान काही गाड्या अंशतः रद्द राहतील.

You may like to read

या गाड्यांवर होईल परिणाम…

या ब्लॉकमुळे ट्रेन क्रमांक 93013 चर्चगेट-डहाणू रोड लोकल केळवे-डहाणू रोड दरम्यान रद्द राहील. तर ट्रेन क्रमांक 93012 डहाणू रोड-विरार लोकल डहाणू रोड-केळवे रोड दरम्यान रद्द राहणार आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांना अतिरिक्त थांबा…
-या कालावधीत ट्रेन क्रमांक 12934 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेसला 27, 27 आणि 28 फेब्रुवारी 2022 रोजी पालघर आणि विरार स्टेशनवर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.
-ट्रेन क्रमांक 12990 अजमेर-दादर सुपरफास्ट एक्स्प्रेसला 26 आणि 28 फेब्रुवारी 2022 रोजी बोईसर आणि विरार स्टेशनवर अतिरिक्त थांबा असेल.
-ट्रेन क्रमांक 09159 वांद्रे टर्मिनस-वापी एक्स्प्रेसला ब्लॉक कालावधीत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत उमरोली स्थानकावर अतिरिक्त थांबा असेल.
-ट्रेन क्रमांक 12489 बिकानेर-दादर एक्स्प्रेसला 27 फेब्रुवारी 2022 रोजी बोईसर आणि विरार स्थानकावर अतिरिक्त थांबा असेल.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

Published Date: February 25, 2022 1:50 PM IST