मुंबई: मुंबईत लोकलने (Local Train) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. राज्य सरकारने (State Govenment) लोकल प्रवासासंदर्भात नवीन दिशा निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार यापुढे केवळ कोरोना लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच लोकलने प्रवास करता येणार आहे.Also Read - Omicron Cases in Maharashtra : मुंबईत दोघांना ओमायक्रॉनची लागण, राज्यातील रुग्णांची संख्या 10 वर

आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना शासकीय व अत्यावश्यक ओळखपत्राच्या आधारावर लोकल पास आणि तिकीट दिले जात होते. तर दोन्ही डोस पूर्ण केलेल्या सामान्य नागरिकांना केवळ मासिक पास दिला जात होता. मात्र आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सामान्य नागरिक प्रत्येकाला लशीचे दोन्ही डोस घेतलेले असतील तरच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे. Also Read - Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेकडून 8 उपनगरीय विशेष गाड्याची सोय!

राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतही लसीकरणाचा मोठा टप्पा पार केला असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे वैद्यकीय सेवा, दूरसंचार क्षेत्र, गॅस पुरवठा, जलपुरवठा शासकीय अधिकारी आदींना आता कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. Also Read - Mahaparinirvan Din : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी!

राज्य शासनातर्फे जारी करण्यात आलेल्या एका परिपत्रकात म्हटले आहे की, “आत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना आतापर्यंत त्यांनी लस घेतली आहे किंवा नाही हे ना बघता पास देण्यात येत होते. परंतु आता लसीकरणाला सुरुवात होऊन बराच वेळ झालेला आहे. तसेच लसीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे आणि लसींचा साठा ही मुबलक आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांमार्फत लसींचा पुरवठाही सुरळीत होत आहे. त्यामुळे आता आत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे”.