मुंबई : कोरोनामुळे (Corona virus) गेल्या दीड वर्षांपासून सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा (Mumbai local) बंद आहे. त्यामुळे मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार याकडे मुंबईकरांचे (mumbaikar) लक्ष लागले आहे. पण अशामध्ये आता सरकारने (Maharashtra Government) वकिलांना (Highcourt Lawyers) आणि हायकोर्टातील क्लार्कना (Highcourt Clerks) लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आता विकालांना आणि हायकोर्टात काम करणाऱ्या क्लार्कना यापुढे लोकलने प्रवास करता येणार आहे.Also Read - Terror Module Busted: मुंबई लोकलमध्ये विषारी गॅसचा हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन, चौकशीतून माहिती उघड!

वकिलांचाही फ्रंट लाईन वर्करमध्ये (Front line worker) समावेश करण्यात आला आहे. लोकलने प्रवास करण्यासाठी वकिलांना आणि हायकोर्टात (Mumbai highcourt) काम करणाऱ्या क्लार्कना मुभा देण्यात आली आहे. पण त्यासाठी त्याचे लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र वकील संघटनेकडे (Bar Association) देणं अनिर्वाय आहे. त्यानंतर या संघटना वकिलांना पासच्या मंजुरीसाठी प्रमाणपत्र देतील. ते प्रमाणपत्र दाखवून वकिलांना पास (Monthly Pass) दिला जाईल त्यांना दैनंदिन तिकीट (Daily ticket) मिळणार नाही, अशी माहिती महाधिवक्त्यांनी (Advocate General) हायकोर्टामध्ये दिली आहे. Also Read - Terror Module: मुंबईच्या जोगेश्वरीमधून सातवा संशयित दशतवादी ताब्यात, महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई

हळूहळू लोकल प्रवासाला इतरांना मुभा दिली जात आहे मग सर्वसामान्यांना कधी मिळणार असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. अशामध्ये सर्वसामान्य जनतेचे काय? असा सवाल हायकोर्टाने केला. लस घेतलेल्यांना घरात बसावे लागत असेल तर लसीकरणाचा (Vaccination) उपयोग काय? असं देखील हायकोर्टाने म्हटलं आहे. यावर महाधिवक्तांनी सांगितले की, ‘लसीचे (Vaccine) दोन्ही डोस घेतेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा सरकारचा मानस आहे.’ तर यावर हायकोर्टाने चर्चगेट ते दहीसर (Churchgate to Dahisar) प्रवास करणाऱ्यांना तीन तास लागत आहे सर्वसामान्यांना गांभीर्याने विचार करा असे हायकोर्टाने सांगितले. तर यावर गुरुवारपर्यंत सरकारची भूमिका स्पष्ट करु असे आश्वासन महाधिवक्तांनी दिली. Also Read - दिलासादायक! 86 टक्के मुंबईकरांमध्ये सापडल्या कोरोनाच्या अँटीबॉडीज, 5व्या सेरो सर्वेक्षणातून माहिती समोर