मुंबई: मुंबईसह राज्यात कोरोनाचा (Covid 19) संसर्ग आटोक्यात आल्याचं चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं लॉकडाऊनचे नियम शिथिल केले आहेत. राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू (School Reopen in Maharashtra)करण्यात आल्या आहेत. तर 7 ऑक्टोबरपासून राज्यभरातील देवस्थानं खुली (Temple Reopen in Maharashtra) करण्यात येणार आहे. अशातच राज्य सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, कोरोना प्रतिबंधक लशीचे (Corona Viccine) दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना आता युनिव्हर्सल पास (Universal Pass) देण्यास सुरूवात करण्यात आली आहे.Also Read - Mumbai Local Update: 28 ऑक्टोबरपासून मुंबईची लाईफलाईन पूर्ण क्षमतेने धावणार, मध्य-पश्चिम रेल्वेवर 100 टक्के लोकल फेऱ्या!

युनिव्हर्सल पासचा (Universal Pass) वापर करुन नागरिकांना लोकल (Mumbai Local), बस तसेच सार्वजनिक वाहतूक आणि विमानाने प्रवास करता येतो. तसेच हा पास दाखवून शॉपिंग मॉलमध्येही (Shopping Mall) प्रवेश करता येईल. Also Read - Breaking News Live Updates: आर्यन खानच्या जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी

कसा मिळवाल युनिव्हर्सल पास?

– https://epassmsdma.mahait.org या संकेतस्थळावर जा.
– Travel Pass for Vaccinated Citizens यावर क्लिक करा.
– आपला कोव्हिड लसीकरणासाठी नोंदविलेला मोबाईल क्रमांक नमूद करा.
– मोबाईलवर ओटीपी पासवर्डचा एसएमएसद्वारे प्राप्त होईल.
– ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपोआप समोर दिसेल.
– ‘जनरेट पास’ (युनिव्हर्सल पास) या पर्यायावर क्लिक करा.
– क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोव्हिड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याची तारीख इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल.
– या तपशिलामध्ये ‘सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करा.
– ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील 24 तासांमध्ये ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ करीता एसएमएसद्वारे लिंक प्राप्त होईल.
– लिंक प्राप्त झाल्यानंतर ‘ई पास’ मोबाईलमध्ये सेव्ह करा.
– मुंबई लोकल स्टेशनवर (उपनगरीय रेल्वे स्टेशन) तिकिट खिडकीवर ई पास दाखवा.
– रेल्वे पास आपल्याला संबंधित अधिकाऱ्याकडून दिला जाईल. Also Read - 'पहचान कौन' आणि 'यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा', नवाब मालिकांच्या ट्वीट्सनी उडवून दिली खळबळ

दरम्यान, देशभरात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत तब्बल 2 हजारांनी घट झाली आहे. देशात 20799 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली तर 180 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.